छोटा राजनचा ‘गेम’ करण्याचा कट उधळला

By admin | Published: June 11, 2016 06:02 AM2016-06-11T06:02:01+5:302016-06-11T06:02:01+5:30

दिल्लीच्या तिहार कारागृहात कैद असलेला कुख्यात गुन्हेगार छोटा राजन याला संपविण्याचा कट पोलिसांनी हाणून पाडला

Chhota Rajan's game cut off! | छोटा राजनचा ‘गेम’ करण्याचा कट उधळला

छोटा राजनचा ‘गेम’ करण्याचा कट उधळला

Next


नवी दिल्ली : दिल्लीच्या तिहार कारागृहात कैद असलेला कुख्यात गुन्हेगार छोटा राजन याला संपविण्याचा कट पोलिसांनी हाणून पाडला. छोटा शकील याने हा कट रचला होता. शकीलने त्यासाठी नेमलेल्या चार काँट्रॅक्ट किलर्सना पोलिसांनी अटक केली.
रॉबिनसन, जुनैद, युनूस आणि मनीष अशी शकीलने नेमलेल्या या काँन्ट्रॅक्ट किलर्सची नावे आहेत. त्यांना ३ जून रोजी अटक करण्यात येऊन पाच दिवसांच्या पोलीस रिमांडमध्ये पाठविण्यात आले होते. या पाच दिवसांच्या चौकशीत त्यांनी छोटा राजनच्या हत्येच्या कटाची कबुली दिली. सध्या या चौघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने या चौघांचे मोबाईल फोनवरील संभाषण पकडल्यानंतर त्यांना जेरबंद केले. हे चौघेही छोटा शकीलच्या संपर्कात होते, असा दावा पोलिसांनी केला. मोबाईल फोनवरील संभाषणाद्वारे ओळख पटल्यानंतर या चौघांना दिल्लीच्या रोहिणी, सीलामपूर गाझियाबाद व नोएडा येथून अटक करण्यात आली. छोटा राजनला २७ वर्षेपर्यंत फरार राहिल्यानंतर इंडोनेशियाच्या बाली येथे अटक करून भारतात आणले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Chhota Rajan's game cut off!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.