छोटा राजनच्या तपासाची सर्व सुत्रे CBI कडे

By admin | Published: November 5, 2015 08:10 PM2015-11-05T20:10:20+5:302015-11-05T20:10:20+5:30

कुख्यात डॉन छोटा राजनच्या विरोधातील गुन्ह्यांची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहीती आज अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के.पी. बक्षी यांनी दिली आहे

Chhota Rajan's investigation will begin with the CBI | छोटा राजनच्या तपासाची सर्व सुत्रे CBI कडे

छोटा राजनच्या तपासाची सर्व सुत्रे CBI कडे

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ५ - कुख्यात डॉन छोटा राजनच्या विरोधातील गुन्ह्यांची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहीती आज अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के.पी. बक्षी यांनी दिली आहे. हा निर्णय मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आली असे ते म्हणाले. यावेळी मुंबई पोलिस आयुक्त जावेद अहमदही उपस्थित होते. छोटा राजनला भारतात आणण्यात सीबीआय आणि आयबीची मोठी मदत झाली आहे. तपासात सीबीआयला सर्व प्रकारची मदत आणि सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. आज रात्री छोटा राजनचे भारतात आगमन होणार आहे.
छोटा राजनला २५ ऑक्टोबरला बाली बेटावर अटक करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियातून इंडोनेशियाला येताच विमानतळावर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. मुंबईत जन्मलेला छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे कधीकाळी दाऊदचा निकटवर्तीय होता. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर दोघे वेगळे झाले. राजनवर मुंबईत हत्या, तस्करी, खंडणी, ड्रग्ज तस्करी यासारखे ७५ गुन्ह्यांची नोंद आहे. २० वर्षापासून सुरक्षा यंत्रणांनेला चकमा देणाऱ्या राजनला इंटरपोलने काढलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे अटक करण्यात आली आहे.
 

Web Title: Chhota Rajan's investigation will begin with the CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.