हा तर घोडे पळाल्यानंतर तबेला बंद करण्याचा प्रकार, आधारच्या व्हर्च्युअल आयडीवर चिदंबरम यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 07:43 PM2018-01-11T19:43:32+5:302018-01-11T19:44:21+5:30
आधारच्या सुरक्षेसाठी ‘यूएडीएआयडी’ने मांडलेली आभासी ओळख क्रमांकाची (व्हर्च्युअल आयडी) संकल्पनेवर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे.
नवी दिल्ली - दुरुपयोग होण्याचा धोका टाळण्यासाठी ‘आधार’धारकांना आता एकदाच वापरता येईल, असा आभासी सांकेतिक क्रमांक (व्हर्च्युअल आयडी) देण्याची नवी सोय ‘युनिक आयडेन्टिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ सुरू करणार आहे. आधारच्या सुरक्षेसाठी ‘यूएडीएआयडी’ने मांडलेली आभासी ओळख क्रमांकाची (व्हर्च्युअल आयडी) संकल्पनेवर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. हा तर घोडे पळाल्यानंतर तबेला बंद करण्याचा प्रकार असल्याची खोटक टीका त्यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे. सरकारने सक्ती केल्यामुळे आतापर्यंत लाखो नागरिकांनी यापूर्वीच आपल्या आधार कार्डाचा नंबर सेवा पुरवठादारांना दिला आहे. त्यामुळे आता आधारची माहिती गोपनीय राखण्यासाठी नव्याने सुरक्षा कवच पुरविण्याचा प्रकार म्हणजे ‘घोडे पळाल्यानंतर तबेला बंद करण्याचा प्रकार, असल्याची टीका चिदंबरम यांनी केली. आता केंद्र सरकार या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आधारचा डेटा सुरक्षित नसल्याचा दावा माध्यमांतील वृत्तांमधून करण्यात आल्यानंतर आधारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
Under compulsion, millions of persons have already shared Aadhaar number with many service providers. New security layer is like locking the stable after horses have bolted.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) January 11, 2018
मोबाइलचे सिमकार्ड संलग्न करणे किंवा अन्य कारणांसाठी ‘आधार’ क्रमांक दिल्यावर त्या व्यक्तीची सर्व माहिती त्रयस्थाच्या हाती पडून तिचा दुरुपयोग होण्याचा धोका टाळण्यासाठी ‘आधार’धारकांना आता एकदाच वापरता येईल, असा आभासी सांकेतिक क्रमांक (व्हर्च्युअल आयडी) देण्याची नवी सोय ‘युनिक आयडेन्टिफिकेशन अॅथॉरिटी आॅफ इंडिया’ सुरू करणार आहे.
यामुळे आपला ‘आधार’ क्रमांक न उघड करता ‘व्हर्च्युअल आयडी’ क्रमांक देऊन गरज भागविण्याचा अधिक सुरक्षित पर्याय मिळेल. ‘व्हर्च्युअल आयडी’ कोणत्याही क्रमवारीविना तयार झालेला १६ अंकी आकडा असेल. त्यावरून मोबाइल कंपनी किंवा अन्य सेवा पुरवठादारांना त्या व्यक्तीचे नाव, पत्ता व छायाचित्र अशी त्या कामासाठी पुरेशी ठरणारी माहिती उपलब्ध होईल. आधारधारकांना ‘यूआयडीएआय’च्या वेबसाइटवरून असा ‘व्हर्च्युअल आयडी’ तयार करून घेता येईल. हा ‘व्हर्च्युअल आयडी’ एकदा वापरला, की त्याची उपयुक्तता संपुष्टात येईल. त्यामुळे प्रत्येक वेळी वापर करताना नवा ‘व्हर्च्युअल आयडी’ घ्यावा लागेल.
१ जूनपासून नवी सोय
‘यूआयडीएआय’च्या वेबसाइटवरून असा ‘व्हर्च्युअल आयडी’ ‘जनरेट’ करण्याची सोय १ मार्च २०१८ पासून सुरू होईल.
केवायसी व ‘आधार’ संग्लनतेचे अधिकार दिलेल्या सर्व सेवा पुरवठादारांना १ जून २०१८ पासून अशा ‘व्हर्च्युअल आयडी’च्या आधारे काम करणे सक्तीचे असेल.
थोडक्यात याचे स्वरूप ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) सारखे असेल. ‘आधार’धारक लागेल त्या त्या वेळेला व कितीही वेळा नवा ‘व्हर्च्युअल आयडी’ मिळवू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.
सेवा पुरवठादारास
‘व्हर्च्युअल आयडी’ व
हाताच्या बोटाचे ठसे दिले
की त्याचे काम भागेल
‘आधार’धारकासच