राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसची चिदंबरम यांना उमेदवारी
By admin | Published: May 28, 2016 03:58 PM2016-05-28T15:58:34+5:302016-05-28T15:58:34+5:30
महाराष्ट्रातून काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांना उमेदवारी देण्यात आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 28 - काँग्रेसने राज्यसभेसाठी उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. महाराष्ट्रातून काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पी चिदंबरम यांना उमेदवारी देण्यात आल्याने सुशिलकुमार शिंदे यांचं नाव शर्यतीतून बाहेर पडलं आहे. तसंच काँग्रेस नेते अविनाश पांडे यांची दुस-या टर्मची संधीदेखील हुकली आहे.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून 11 जूनला मतदान होणार आहे. राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी घोषित केली असून शिवसेनेकडून संजय राऊत आणि भाजपाकडून पियुष गोयल रिंगणात आहेत. भाजपाने दोन नावांची घोषणा अद्याप केलेली नाही.
काँग्रेसने इतर राज्यांमधील राज्यसभा उमेदवारांची नावेही घोषित केली आहेत. कर्नाटकमधून ऑस्कर फर्नींडिस आणि जयराम रमेश यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तराखंडमधून प्रदिप, पंजाबमधून अंबिका सोनी आणि उत्तरप्रदेशमधून कपिल सिब्बल यांनी उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.