चिदम्बरम यांची न्यायालयीन कोठडी २७ पर्यंत वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 06:09 AM2019-11-14T06:09:38+5:302019-11-14T06:09:50+5:30
आयएनएक्स मीडिया मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांची न्यायालयीन कोठडी दिल्लीच्या न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांची न्यायालयीन कोठडी दिल्लीच्या न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.
दिल्लीत वकिलांचा संप सुरू असल्यामुळे चिदम्बरम यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर करता आले नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांना कोर्टामोर हजर करण्यात आले. ईडीने त्यांची कोठडी वाढविण्याची विनंती कोर्टाला केली. ती मंजूर करण्यात आली. ७४ वर्षीय चिदम्बरम यांना २१ आॅगस्ट रोजी अटक करण्यात आली व सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ते ईडीच्या कोठडीत आहेत. चिदम्बरम यांनी दाखल केलेल्या जामिनासाठीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने ८ नोव्हेंबर रोजी निकाल राखीव ठेवला होता. त्यावेळी ईडीने जामिनाला विरोध दर्शवला होता.