महागाईवरून जेटलींना चिदंबरम यांचे प्रत्युत्तर
By admin | Published: July 30, 2016 05:16 AM2016-07-30T05:16:29+5:302016-07-30T05:16:29+5:30
संपुआ सरकारने आमच्यासाठी दोन अंकी महागाई मागे सोडली होती, ही अर्थमंत्री अरुण जेटली यांची टीका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी फेटाळली आहे. या टीकेत कोणतेही
नवी दिल्ली : संपुआ सरकारने आमच्यासाठी दोन अंकी महागाई मागे सोडली होती, ही अर्थमंत्री अरुण जेटली यांची टीका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी फेटाळली आहे. या टीकेत कोणतेही तथ्य नाही, असे चिदंबरम म्हणाले.
चिदंबरम यांनी टिष्ट्वट करून जेटली यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. चिदंबरम म्हणाले की, ‘संपुआने दोन अंकी महागाई मागे सोडली होती, असे अर्थमंत्री म्हणतात. जून २0१४ मध्ये सीपीआय (ग्राहक वस्तू निर्देशांक) ६.७७ टक्क्यांवर तर डब्ल्यूपीआय (ठोक किंमत निर्देशांक) ५.६६ टक्क्यांवर होता. अर्थमंत्र्यांनी दोन आकडे स्वत:चे टाकले आहेत का? जंतर-मंतर आकडेवारी!’
काल लोकसभेत महागाईवरील चर्चेला उत्तर देताना जेटली यांनी सांगितले होते की, २0१४ मध्ये संपुआ सरकारने आमच्यासाठी दोन अंकी महागाई मागे ठेवली होती. ती आता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. चांगल्या मान्सूनमुळे ती आणखी कमी होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
महागाईचा मुद्दा गाजला
राहुल गांधी यांनी मोदी महागाई कमी करण्यात ते अपयशी ठरले आहेत. ‘हरहर मोदी’ऐवजी लोक आता ‘अरहर मोदी’ अशी नवी घोषणा देऊ लागले आहेत.’ उत्तर भारतात तूर डाळीला अरहर म्हटले जाते. तूर डाळीच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. यासंदर्भात राहुल गांधी यांनी वरील विधान केले होते.