"भारतात EVM..."; मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचं इलॉन मस्क यांना उत्तर, स्पष्टच बोलले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:30 IST2025-01-07T17:29:49+5:302025-01-07T17:30:47+5:30

मस्क यांनी 15 जून 2024 रोजी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले होते की, ईव्हीएमचा वापर बंद करायला हवा. हे एखाद्या व्यक्तीद्वारे अथवा आर्टीफिशिअल इंटेलिजन्स (एआय)च्या सहाय्याने हॅक केले जाऊ शकते.

Chief Election Commissioner Rajiv Kumar's reply to Elon Musk over EVM spoke clearly | "भारतात EVM..."; मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचं इलॉन मस्क यांना उत्तर, स्पष्टच बोलले 

"भारतात EVM..."; मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचं इलॉन मस्क यांना उत्तर, स्पष्टच बोलले 

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएम हॅक होण्यासंदर्भातील सर्व आरोपांचे निवडणूक आयोगाने खंडन केले आहे. ईव्हीएमसंदर्भात कसल्याही प्रकारची छेडछाड होऊ शकत नाही, असे आयोगाने म्हटले आहे. खरे तर, गेल्या वर्षात झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर, टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक तथा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या इलॉन मस्क यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (ईव्हीएम) सुरक्षिततेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते, असे त्यांनी म्हटेले होते.

काय म्हणाले होते मस्क? -
मस्क यांनी 15 जून 2024 रोजी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले होते की, ईव्हीएमचा वापर बंद करायला हवा. हे एखाद्या व्यक्तीद्वारे अथवा आर्टीफिशिअल इंटेलिजन्स (एआय)च्या सहाय्याने हॅक केले जाऊ शकते.

निवडणूक आयोगाचे उत्तर -
दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी मंगळवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राजीव कुमार यांनी EVM हॅक होण्यासंदर्भातील आरोपांना प्रत्युत्तर दिले. मात्र, मुख्य निवडणूक आयुक्तांनी कुणाचेही नाव घेतले नाही. ते म्हणाले, एक तंत्रज्ञ आहेत, जे ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहेत. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, ते जे बोतत आहेत, तसे अमेरिकेत तर होऊ शकते. तेथे वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान केले जाऊ शकते. तेथील मशीन्स इंटरनेटला कनेक्ट असतात. मात्र हे भारतात शक्य नाही."

"भारतामध्ये ईव्हीएमसोबत छेडछाड केली जाऊ शकत नाही. ईव्हीएममध्ये कुठल्याही प्रकारचे बग अथवा व्हायरस नाही. तसेच, हे हॅक केले जाऊ शकत नाही, हे निराधार आहे, असे सर्वोच्च न्यायालयानेही अनेक वेळा म्हटले आहे," असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाचे हे उत्तर इलॉन मस्क यांच्या 'त्या' विधानाशी जोडले जात आहे.

सायंकाळी 5 नंतर मतदानाची टक्केवारी कशी वाढते?
पत्रकारांशी संवाद साधताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, आजकाल प्रत्येक निवडणुकांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मतदारांमध्ये मिस मॅच झाले, मतमोजणी मंदावली, ईव्हीएम हॅक केले...अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित केले जातात. सायंकाळी 5 नंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचा आरोपही केला जातोय. पण, मतदानाची टक्केवारी कुठे वाढली, याची आम्हालाही माहिती द्या, आम्ही त्याची चौकशी करू. 

'या' सर्वांचा अभ्यास केल्यानंतर अंतिम आकडा जारी केला जातो -
पोलिंग एजंट सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदान केंद्रातच असतात. ते मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतात. सर्व काही त्यांच्या समोर घडते. मतदान संपण्यापूर्वी, मतदान केंद्र सोडण्यापूर्वी फॉर्म 17 सी भरला जातो, ज्यामध्ये मतांची संख्या नोंदवली जाते. सेक्टर मॅजिस्ट्रेट दिवसभरात वेगवेगळ्या वेळी मतदान केंद्राला भेट देतात आणि मतदानाची नोंद घेतात ट्रेंड समजून घेण्याचा प्रयत्न करतात. जगात कुठेही मतदान संपल्यानंतर 6 वाजता लगेचच मतदानाची टक्केवारी दिली जात नाही. 5 वाजल्यानंतर पीठासीन अधिकारी मतदारांना ठिकठिकाणी टोकन देतात. मग शेवटचे मतदान झाल्यानंतर ते पॅक केले जाते. फॉर्म 17 सी भरला जातो. त्याची संख्या लाखात आहे. या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर अंतिम आकडा जारी केला जातो, अशी महत्वाची माहिती राजीव कुमार यांनी यावेळी दिली. 
 

Web Title: Chief Election Commissioner Rajiv Kumar's reply to Elon Musk over EVM spoke clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.