पडद्यामागील मुख्य सूत्रधार रडारवर पोलीस अधीक्षक : एमआयएमच्या सचिवालाही केली अटक

By admin | Published: June 25, 2016 11:03 PM2016-06-25T23:03:51+5:302016-06-25T23:03:51+5:30

जळगाव: गोलाणी मार्केट, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अजिंठा चौकात धुडगूस घालणार्‍या लोकांना भडकावणार्‍या पडद्यामागील सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठारे कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी दिला आहे. दरम्यान, गोलाणीतील दगडफेक प्रकरणात शनिवारी एमआयएमचा सचिव ऐनोद्दीन अमरोद्दीन शेख (शाहू नगर) याला अटक करण्यात आली आहे.

The chief facilitator behind the scenes has also arrested the Superintendent of Police of MIM: MIM secretary | पडद्यामागील मुख्य सूत्रधार रडारवर पोलीस अधीक्षक : एमआयएमच्या सचिवालाही केली अटक

पडद्यामागील मुख्य सूत्रधार रडारवर पोलीस अधीक्षक : एमआयएमच्या सचिवालाही केली अटक

Next
गाव: गोलाणी मार्केट, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अजिंठा चौकात धुडगूस घालणार्‍या लोकांना भडकावणार्‍या पडद्यामागील सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठारे कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी दिला आहे. दरम्यान, गोलाणीतील दगडफेक प्रकरणात शनिवारी एमआयएमचा सचिव ऐनोद्दीन अमरोद्दीन शेख (शाहू नगर) याला अटक करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही फुटेज व जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांनी केलेली व्हिडीओ शुटिंगची तपासणी केली असता त्यात ३५ जणांची नावे निष्पन्न झालीत. त्यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी राबविण्यात आलेल्या धरपकड मोहीमेत मोहसीन शब्बीर बागवान (वय २३ रा.जोशी पेठ), मोहम्मद बिलाल मो.फारुख शेख (वय २८ रा.मास्टर कॉलनी),इम्रान खान अब्दुल खान (वय २३ रा. हुडको, पिंप्राळा), वसीम खान अब्दुल खान (वय २३ रा.हुडको, पिंप्राळा), अमीर अली मो.अली सैयद (वय २४ रा.शिवाजी नगर),कलीम सैयद जुबेर अली (वय ४५शिवाजी नगर), दानेश नासीर हुसेन शेख (वय १९ रा.इस्लामपुरा) व सात जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील मोहसीन बागवान व मोहम्मद बिलाल हे दोनजण जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत तर उर्वरितांना अटक करण्यात आली होती. आता अटकेतील संख्या सहा झाली आहे.
अटकसत्र सुरुच ठेवणार
शहर व एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल गुन्‘ात संशयित आरोपींच्या अटकेचे सत्र सुरुच ठेवणार असून त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी व शहर पोलीस स्टेशनचे पथके कामाला लावण्यात आली आहेत. शांतता नांदावी यासाठी पाच स्ट्रॅकिंग फोर्स शहरात कायमस्वरुपी लावण्यात आल्याची माहिती सुपेकर यांनी दिली.
इन्फो...
मशीदीतून दिला संदेश
जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी एकत्र जमण्याचा संदेश मशिदीतून देण्यात आल्याची माहिती तपासात उघड झाल्याचे सुपेकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र जमल्यानंतर गोलाणी मार्केटमध्ये हल्ला झाला. या पार्श्वभूमीवर मशीदीचे मौलाना व ट्रस्टी यांची सोमवारी बैठक घेण्यात येणार असल्याचे सुपेकर म्हणाले.
कोट..
अशा जातीयवादी घटनांमागे कोण व कोणती शक्ती कार्यरत आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. लीडरशीप करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यांचे कागदोपत्री रेकॉर्ड तयार केले जात आहे.
-डॉ.जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षक

Web Title: The chief facilitator behind the scenes has also arrested the Superintendent of Police of MIM: MIM secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.