प्रजासत्ताक दिनी अबूधाबीचे प्रिन्स असणार प्रमुख पाहुणे
By admin | Published: October 3, 2016 06:01 PM2016-10-03T18:01:48+5:302016-10-03T18:02:21+5:30
अबूधाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जाएद अल नाहयान पुढील वर्षी भारतात प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे असणार
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - अबूधाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जाएद अल नाहयान पुढील वर्षी भारतात प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे असणार आहेत. कधीकाळी पाकिस्तानच्या अत्यंत जवळ असलेलं अबूधाबी हे संयुक्त अरब अमीरातच्या (यूएई ) 7 सदस्यांपैकी सर्वात ताकदवान आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी शेख मोहम्मद बिन जाएद अल नाहयान यांना याबाबत निमंत्रण दिले होते. क्राउन प्रिन्स यांनी निमंत्रण दिल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत. सौदी अरबने केलेल्या हवाई हल्ल्यांचं समर्थन करायला पाकिस्तानने नकार दिला होता तेव्हापासून पाकिस्तानसोबतचे त्यांचे संबंध ताणले गेले होते. गेल्या वर्षी तब्बल तीन दशकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी युएईला गेले होते .तर फेब्रुवारी महिन्यात क्राउन प्रिन्स भारतात आले असताना प्रोटोकॉल तोडून मोदी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले होते.