मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायमूर्तींची बैठक घेणार - रमणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 08:24 AM2022-04-17T08:24:37+5:302022-04-17T08:25:20+5:30
तेलंगणातील न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या एका परिषदेला संबोधित करताना न्या. रमणा म्हणाले की, घटनात्मक न्यायालयीन पायाभूत सुविधा प्राधिकरणाची राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर निर्मिती व्हावी, यासाठी मी करीत असलेले प्रयत्न आपण जाणताच.
नवी दिल्ली : घटनात्मक ‘न्यायालयीन पायाभूत सुविधा प्राधिकरणा’च्या उभारणीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी एप्रिलअखेरीस उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायमूर्ती आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांची संयुक्त बैठक घेऊ, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी केले.
तेलंगणातील न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या एका परिषदेला संबोधित करताना न्या. रमणा म्हणाले की, घटनात्मक न्यायालयीन पायाभूत सुविधा प्राधिकरणाची राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर निर्मिती व्हावी, यासाठी मी करीत असलेले प्रयत्न आपण जाणताच. या महिन्याच्या अखेरीस देशातील सर्व मुख्य न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्री यांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीत अपेक्षित परिणाम येतील, अशी अपेक्षा आहे. सरन्यायाधीश रमणा यांच्याकडून आपणास राष्ट्रीय न्यायालयीन पायाभूत सुविधा प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव मिळाला असल्याचे कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी अलीकडेच संसदेत सांगितले आहे.