दीपक मिश्रा होणार सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 09:14 PM2017-08-08T21:14:58+5:302017-08-08T21:15:09+5:30
नवी दिल्ली, दि. 8 - सर्वोच्च न्यायालयाच्या 45व्या मुख्य न्यायाधीशपदी दीपक मिश्रा यांनी नियुक्ती झाली आहे. केंद्र सरकारनं राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर ही घोषणा केली आहे. सध्याचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांचा कार्यकाळ 27 ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यानंतर दीपक मिश्रा त्यांचा पदभार सांभाळणार आहेत.
दीपक मिश्रा 3 ऑक्टोबर 2018पर्यंत या पदावर राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश असलेल्या दीपक मिश्रा यांच्या नावावर अनेक ऐतिहासिक सुनावण्या आहेत. याकूब मेमनच्या प्रकरणात त्यांनी रात्र जागवून सुनावणी केली होती. त्यानंतर न्यायपूर्णरीत्या याकूब मेमनला फाशी देण्यात आली. निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यासह त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. देशभरातील सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीत लावण्याचे आदेशही मिश्रा यांनीच दिले होते.