सरन्यायाधीशांच्या कारच्या नंबरमध्ये CJI, अमित शाह यांच्या काय? लोकसभेपूर्वी जोरदार व्हायरल होतोय...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 11:48 AM2024-03-01T11:48:51+5:302024-03-01T11:52:56+5:30
भाजपाच्या काल रात्रीच्या हायलेव्हल मिटींगला अमित शाह या एसयुव्ही कारमधून आले होते. याचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला आहे.
काही दिवसांपूर्वी आपल्या देशाचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपूत्र डी वाय चंद्रचूड यांच्या गाडीचा नंबर व्हायरल झाला होता. सरन्यायाधीशांच्या कारच्या नंबरमध्ये CJI अशी अक्षरे होती. यावरून निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या कारला ECI असा नंबर हवा होता, असे चर्चिले जात होते. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गाडीचा नंबर व्हायरल होत आहे.
सरन्यायाधीशांच्या कारच्या नंबरमध्ये CJI, अमित शाह यांच्या काय? लोकसभेपूर्वी जोरदार व्हायरल होतोय...
भाजपाच्या काल रात्रीच्या हायलेव्हल मिटींगला अमित शाह या एसयुव्ही कारमधून आले होते. याचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला आहे. असा काय नंबर आहे, की जो लोकसभा निवडणुकीपूर्वी एवढा लक्षवेधी ठरत आहे, चला पाहुया...
अमित शाह यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) देशभरात लागू करण्यावर भर दिला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हा कायदा देशभरात लागू होईल असेही बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी होण्यापूर्वी गृह मंत्रालयाला हा कायदा लागू करायचा आहे.
त्यातच अमित शाह यांच्या कारचा नंबर डीएल1 सीएए 4421 असा होता. यामुळे सोशल मीडियामध्ये हा कायदा लागू होण्याची चर्चा सुरु झाली आहे. या नंबरची कार घेऊन शाह भाजपाच्या मुख्यालयात गेले होते.
सीएएसाठीचे सर्व नियम तयार असून, ऑनलाइन पोर्टलदेखील तयार झाले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल आणि अर्जदार त्यांच्या मोबाइल फोनवरुन नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतील. अर्जदारांनी भारतात प्रवेश केल्याचे वर्ष नमूद करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, यासाठी अर्जदारांकडून कोणतीही कागदपत्रे मागितली जाणार नाहीत. या कायद्यानुसार, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे.