मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडली, शुगर लेव्हल ४६ पर्यंत घसरली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 02:30 PM2024-03-27T14:30:48+5:302024-03-27T14:35:14+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडली आहे, त्यांची शुगर लेव्हल ४६ पर्यंत घसरली आहे.

Chief Minister Arvind Kejriwal's health deteriorated, sugar level dropped to 46 | मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडली, शुगर लेव्हल ४६ पर्यंत घसरली

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडली, शुगर लेव्हल ४६ पर्यंत घसरली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केली आहे. आज त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे, अरविंद केजरीवाल यांची शुगर लेव्हल ४६ पर्यंत घसरली आहे. 

याआधी बुधवारी, सीएम केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी एक व्हिडीओ जारी केला होता, यात त्यांनी म्हटले होते की, मंगळवारी संध्याकाळी त्या तुरुंगात आपल्या पतीला भेटायला गेल्या होत्या. केजरीवाल यांना मधुमेह आहे, शुगरची   पातळी ठीक नाही, ते खरे देशभक्त, निर्भय आणि धाडसी व्यक्ती आहेत. त्यांना दीर्घायुष्य, आरोग्य आणि यशासाठी शुभेच्छा. माझं शरीर तुरुंगात आहे पण आत्मा तुम्हा सर्वांमध्ये आहे, असंही त्यांनी सांगितलं. 

Baltimore Bridge Collapse : अमेरिकन सरकारने भारतीय क्रू मेंबरांचे केले कौतुक; कारण जाणून तुम्हीही सलाम कराल

अरविंद केजरीवालांच्या अटकेचा निषेध

 दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल यांना कथित अबकारी घोटाळ्याप्रकरणी अटक केल्याच्या निषेध करण्यासाठी मंगळवारी पणजी येथील आझाद मैदानावर जमलेल्या इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांना पोलिसांनी रोखले. त्यामुळे काही काळ वातावरण तंग बनले; नंतर सर्व नेते, कार्यकर्त्यांना आझाद मैदानात प्रवेश देण्यात आला. तेथे इंडिया आघाडीने आपले शक्तिप्रदर्शन केले.

भाजपाने पुन्हा केली अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी

आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. "आमची मागणी आहे की, अरविंद केजरीवाल भ्रष्ट असून त्यांनी दिल्लीची लूट केली असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा. आप चोरांना वाचवत आहे. आमचा लढा हा दिल्लीतील जनतेचा लढा आहे."

Web Title: Chief Minister Arvind Kejriwal's health deteriorated, sugar level dropped to 46

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.