शेतकऱ्यांचं मन वळविण्यासाठी मुख्यमंत्री चौहान यांचं उपोषण
By admin | Published: June 10, 2017 02:33 PM2017-06-10T14:33:23+5:302017-06-10T14:36:44+5:30
शेतकऱ्यांचं आंदोलन शांत करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांची मनं वळविण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबिला आहे
Next
ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 10- मध्य प्रदेशामध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. संतप्त शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे मध्य प्रदेश पूर्णपणे अशांत झालं आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन शांत करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांची मनं वळविण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबिला आहे. शेतकऱ्यांशी थेट संवाज साधण्यासाठी त्यांनी भोपाळमध्ये उपोषण सुरू केलं आहे. जोपर्यंत राज्यामधील हिंसाचार थांबणार नाही तोपर्यत उपोषण सुरूच ठेवणार असा निर्धारही मुख्यमंत्री चौहान यांनी केला आहे. चौहान हे भोपाळमधील दसरा मैदानात लोकांशी थेट संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपोषणात सहभागी होण्यासाठी भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्री दसरा मैदानावर पोहोचले आहेत. मंचावर चौहान यांच्या पत्नी साधना सिंह, ज्येष्ठ नेते बाबूलाल गौर, प्रभात झा यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थितीत आहेत.
Madhya Pradesh farmers' agitation: CM Shivraj Singh Chouhan reaches Bhopal's Dussehra Maidan to sit on fast "for peace" #Mandsaurpic.twitter.com/5QJW20nI3D
— ANI (@ANI_news) June 10, 2017
उपोषण सुरू करण्यापूर्वी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या बाबतीत संवेदनशील असल्याचं मत शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केलं आहे. शेतकऱ्यांविषयी आमच्या मनाच आदर आहे. काही लोकांकडून राज्यातील परिस्थिती बिघडविण्याचा प्रयत्न केला जातं आहे, यासाठी लहान मुलांच्या हातात दगडं दिली जातात, असंही ते म्हणाले आहेत. जेव्हा सरकार चर्चेसाठी तयार नसतं, तेव्हा आंदोलन केलं जावं. आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत, असं शिवराजसिंह चौहान त्यांनी उपोषण सुरू करण्यापूर्वी म्हटलं होतं. शेतकऱ्यांना योग्य भाव देणं हे निश्चित केलं जाईल. आमच्या सरकारचे लक्ष्य हे राज्य आणि राज्यातील जनतेचा विकास करणं आहे, असं स्पष्टिकरण शिवराजसिंह चौहान यांनी दिलं आहे.
Madhya Pradesh farmers' agitation: CM Shivraj Singh Chouhan reaches Bhopal's Dussehra Maidan to sit on fast "for peace" #Mandsaurpic.twitter.com/5QJW20nI3D
— ANI (@ANI_news) June 10, 2017
शेतकरी संपाला का लागलं हिंसक वळण ?
शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना पोलिसांच्या गोळीबारात ५ आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे मध्यप्रदेशातील शेतकरी आंदोलन हिंसक झालं. संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यासह अनेक वाहनांना आगीच्या हवाली केलं. गृहमंत्री भूपेंद्रसिंह यांनी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याचा इन्कार केला आहे. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने जमावबंदी लागू करण्यासह इंटरनेटवर बंदी घातली आहे. दरम्यान, राज्य सरकारने गोळीबाराच्या चौकशीचे आदेश दिले होते. राज्याच्या मंदसौर जिल्ह्यातील दलौदा येथे संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांत चकमक तसेच दगडफेक झाली. एक हजार शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी आठ मालमोटारी (ट्रक) आणि दोन दुचाकींना आगीच्या हवाली केले आणि पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर दगडफेकही केली.