केजरीवालांच्या समर्थनार्थ चार राज्यांचे मुख्यमंत्री दिल्लीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 10:28 PM2018-06-16T22:28:24+5:302018-06-16T22:44:57+5:30

पिनराई विजयन, ममता बॅनर्जी, एच. डी. कुमारस्वामी व चंद्रबाबू नायडू अचानक भेटल्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये तर्कवितर्क सुरू झाले.

Chief Minister of Delhi in support of Kejriwal | केजरीवालांच्या समर्थनार्थ चार राज्यांचे मुख्यमंत्री दिल्लीत

केजरीवालांच्या समर्थनार्थ चार राज्यांचे मुख्यमंत्री दिल्लीत

Next

नवी दिल्ली : केरळ, पश्चिम बंगाल, कर्नाटक व तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची शनिवारी अचानक दिल्लीच्या आंध्र प्रदेश भवनामध्ये बैठक झाली. ते निती आयोगाच्या बैठकीसाठी आले होते. मात्र पिनराई विजयन, ममता बॅनर्जी, एच. डी. कुमारस्वामी व चंद्रबाबू नायडू अचानक भेटल्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये तर्कवितर्क सुरू झाले.

आज संध्याकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी पोहोचले आणि त्यांनाही बैजल यांनी भेटण्यासाठी परवानगी दिली नाही. यावर केजरीवाल यांनी टि्वट करून, हे सगळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून होत आहे.  नायब राज्यपाल हे स्वत: चा निर्णय घेत नाही आहेत. ते पंतप्रधानांच्या आदेशावर चालतात, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.



 

नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी भेटण्यासाठी वेळ दिला नाही. अशी परिस्थिती कोणवरही येऊ शकते. गेल्या चार महिन्यापासून दिल्लीतील काम बंद आहे. केंद्र सरकार सुडबुद्धीने वागत आहे. राजधानी दिल्ली सारख्या छोट्या राज्याचे म्हणणे ऐकले जात नसेल तर मोठ्या राज्यांचे काय होणार? असा सवाल कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. तर, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले की, आम्ही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकडे लक्ष द्यावे आणि समस्या सोडवावी, अशी मागणी त्यांच्याकडे करणार आहोत. तसेच, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिल्लीतल्या समस्येला केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. 



 




या चारही मुख्यमंत्र्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या धरणे आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राजभवनात त्यांची भेट घेण्याचे ठरविले होते. त्यांनी त्यासाठी नायब राज्यपाल अनिल बैजल यांना तसे पत्रही लिहिले. मात्र त्यांना केजरीवाल यांची भेट घेण्यास राज्यपालांनी नकार दिला.



 





 



 

Web Title: Chief Minister of Delhi in support of Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.