मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या भेटीला
By admin | Published: February 28, 2017 12:55 PM2017-02-28T12:55:30+5:302017-02-28T12:58:20+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी राजधानी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी राजधानी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील महापौर पदाच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
पर्यावरण विभागाच्या बैठकीनिमित्त मुख्यमंत्री आज नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री थेट पंतप्रधानांच्या भेटीला पोहोचले. भाजपाची मदत न घेता अन्य कुणाचेही सहकार्य घेऊन मुंबई महापालिकेचे महापौरपद मिळवायचे, असा निर्धार शिवसेनेने केल्याचे दिसत आहे. याविषयीच मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीत पंतप्रधानांशी चर्चा करत असल्याचे बोलले जात आहे.
निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने मुंबई मनपामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना-भाजपाला मॅजिक फिगर गाठण्यात अडचण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
दरम्यान, बैठकीनंतर भाजपाकडून काय निर्णय घेण्यात येणार, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.