मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाराणसीतील गीतरामायणात रंगले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 09:20 PM2019-01-10T21:20:34+5:302019-01-10T21:24:31+5:30

गेले तीन दिवस मुंबईत बेस्टचा संप सुरू आहे. आज दुपारी वाराणसीला जाण्यापूर्वी त्यांनी बेस्ट संपाबाबत बेस्टच्या महाव्यवस्थापकांशी सविस्तर चर्चा केली.

Chief Minister Fadnavis in Varanasi enjoying Geet Ramayan | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाराणसीतील गीतरामायणात रंगले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाराणसीतील गीतरामायणात रंगले

Next

- मनोहर कुंभेजकर


मुंबई : आपल्या रोजच्या दैनंदिन कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सतत कार्यमग्न असतात. संगीताचे रसिक असलेल्या मुख्यमंत्र्यांना आज थोडी उसंत मिळाली ती चक्क उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये. चक्क येथे सुरू असलेल्या गीत रामायणात मुख्यमंत्री जणू रंगून गेले.


गेले तीन दिवस मुंबईत बेस्टचा संप सुरू आहे. आज दुपारी वाराणसीला जाण्यापूर्वी त्यांनी बेस्ट संपाबाबत बेस्टच्या महाव्यवस्थापकांशी सविस्तर चर्चा केली.


आज सायंकाळी कविश्रेष्ठ स्व. ग. दि.माडगूळकर व गायक स्व. सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त “गीत रामायण” कार्यक्रमाचे आयोजन वाराणसी येथे संत कबीर मार्ग, सरोजा पॅलेस येथे करण्यात आले होते. फिल्म सिटीचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्र (राज्यमंत्री दर्जा) आणि यांनी खास वाराणसीहून लोकमतला ही माहिती दिली. यावेळी येथील मराठी भाषिक देखिल मोठ्या संख्येने उपस्थित होते, असे त्यांनी सांगितले.


तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी येथील काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदार संघातील या मंदिर परिसराचा कसा विकास होणार आहे, याची माहिती यावेळी मंदिराचे विशेष कार्यकारी अधिकारी विशाल सिंह यांनी फडणवीस यांना दिली. यावेळी राज्यमंत्री अमरजीत मिश्र व उत्तरप्रदेशचे राज्यमंत्री डॉ. नीलकंठ तिवारी आणि इतर उपस्थित होते.

Web Title: Chief Minister Fadnavis in Varanasi enjoying Geet Ramayan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.