सेवा हमी विधेयक आणणार - मुख्यमंत्री फडणवीस

By admin | Published: October 31, 2014 07:43 PM2014-10-31T19:43:22+5:302014-10-31T19:51:41+5:30

जनतेची कामं वेळेत व्हावी यासाठी राज्यात सेवा हमी विधेयक आणू अशी घोषणा राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Chief Minister Fadnavis will introduce a guarantee of service | सेवा हमी विधेयक आणणार - मुख्यमंत्री फडणवीस

सेवा हमी विधेयक आणणार - मुख्यमंत्री फडणवीस

Next

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३१ - जनतेची कामं वेळेत व्हावी यासाठी राज्यात सेवा हमी विधेयक आणू अशी घोषणा राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्याची गेल्या १५ वर्षात विस्कटलेली घडी नीट बसवून महाराष्ट्राला नंबर वन बनवू असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले. 

शपथविधी सोहळ्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला. यापूर्वीही अनेकदा पत्रकार परिषद घेतल्या पण आज थोडे दडपण जाणवतंय असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जनतेला पारदर्शी, गतिमान सरकार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करु.  जनतेला कामांसाठी सरकारी कार्यालयाच्या फे-या माराव्या लागू नये यासाठी सेवा हमी विधेयक राबवणार अशी घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. या विधेयकामुळे जनतेला ठराविक वेळेत त्यांची कामं पूर्ण करुन घेण्याचा अधिकार मिळेल असेही त्यांनी सांगितले. आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी उद्यापासून कामाला लागू असेही त्यांनी सांगितले. या विधेयकासाठी आम्ही एक समितीही नेमली असून ही समिती महिनाभरात मसुदा अहवाल सादर करेल असे फडणवीस यांनी नमुद केले. 

गरज असेल तिथे कारवाई 

गरज असेल तिथे आम्ही कारवाई करु, फक्त व्यक्ती बघून आम्ही कारवाई करणार नाही असे फडणवीस यांनी सांगितले. राज्याला विकासाच्या वाटेवर नेताना आमच्या हातून चुका होतील मात्र जनतेशी बेईमानी करणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

 

Web Title: Chief Minister Fadnavis will introduce a guarantee of service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.