हिमाचलच्या मुख्यमंत्रिपदी जयराम ठाकूर, सोहळ्याला पंतप्रधानांसह भाजपाचे अनेक बडे नेते उपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 03:54 AM2017-12-28T03:54:11+5:302017-12-28T03:54:17+5:30
हिमाचल प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून जयराम ठाकूर यांनी बुधवारी येथे शपथ घेतली. रीज ग्राऊंडवर झालेल्या या समारंभात ११ मंत्र्यांनाही राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
शिमला : हिमाचल प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून जयराम ठाकूर यांनी बुधवारी येथे शपथ घेतली. रीज ग्राऊंडवर झालेल्या या समारंभात
११ मंत्र्यांनाही राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रिमंडळात सहा नव्या चेह-यांना संधी मिळाली आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. मंत्रिमंडळातील सर्व १२ जागा भरण्यात आल्या असून दोन आमदारांना विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून सामावून घेतले जाईल. राजीव बिंदाल हे विधानसभेचे अध्यक्ष असतील. सुरेश भारद्वाज व गोविंद सिंह यांनी संस्कृतमधून तर इतरांनी हिंदीतून शपथ घेतली. मंत्रिमंडळात सर्वीन चौधरी या एकमेव महिला आहेत. नव्या मंत्र्यांमध्ये मोहिंदर सिंह, कृष्णन कपूर, सुरेश भारद्वाज, अनिल शर्मा, सर्वीन
चौधरी, राम लाल मार्केंड, विपीन परमार, विरेंद्र कंवर, गोविंद ठाकूर, राजीव सैझल आणि विक्रम सिंह यांचा समावेश आहे. जय राम
ठाकूर यांच्यासह दोन मंत्री मंडी जिल्ह्यातील आहेत.
पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रोमेश धवाला व नरेंद्र ब्रॅगाटा यांना मंत्रीपद दिले गेलेले नाही. मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह सहा राजपूत (मोहिंदर सिंह, विपीन
परमार, विरेंद्र कंवर, गोविंद ठाकूर आणि विक्रम सिंह), तीन ब्राह्मण (सुरेश भारद्वाज, अनिल शर्मा व राम लाल मार्केंड) आणि दोन इतर मागासवर्गीय आहेत.
>एकाच जिल्ह्यातून चौघांना मंत्रिपद
चार जण कांगरा तर शिमला, सोलन, कुल्लू, ऊना वलाहौल आणि स्पिती जिल्ह्यांतून प्रत्येकी एकाला तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नद्दा यांचा बिलासपूर व माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल यांचा हमीरपूर जिल्हा तसेच चांभा व सिरमूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही.
भाजपने विधानसभेच्या ताज्या निवडणुकीत कांगरा व मंडी जिल्ह्यात २० जागा जिंकल्या आहेत. याशिवाय अनुसूचित जातींसाठीच्या १७ पैकी १३ तर अनुसूचित जमातींसाठीच्या तीनपैकी २ जागा जिंकल्या.