आपल्या लोकांसाठी मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी केली २४ कि.मी. पायपीट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 00:32 IST2020-09-13T00:32:28+5:302020-09-13T00:32:54+5:30
४१ वर्षीय मुख्यमंत्र्यांना लुगुथांग गावात जायचे होते.

आपल्या लोकांसाठी मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी केली २४ कि.मी. पायपीट!
इटानगर : अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी तवांग जिल्ह्यातील मुक्तो मतदारंघातील एका दूरवर्ती गावातील लोकांना भेटण्यासाठी डोंगररांगांमधून तब्बल २४ कि.मी. अंतर पायी चालून प्रवास केला. ११ तास पायपीट केल्यानंतर ते गावात पोहोचले. ४१ वर्षीय मुख्यमंत्र्यांना लुगुथांग गावात जायचे होते. हा भाग डोंगररांगांचा बनलेला आहे. खंडू यांनी टष्ट्वीटमध्ये म्हटले की, कार्पु-ला आणि लुगुथांग हे अंतर पार करण्यासाठी केलेला प्रवास कठोर होता.