किरण बेदींच्या निषेधार्थ पुडुच्चेरीच्या मुख्यमंत्र्यांचे दुसऱ्या दिवशीही धरणे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 12:42 AM2019-02-15T00:42:55+5:302019-02-15T00:43:15+5:30

किरण बेदींचा निषेध करण्यासाठी काळे कपडे परिधान केलेले व्ही. नारायणस्वामी व त्यांचे मंत्री बुधवारी रात्री राजभवनासमोरच झोपले. नागरिकांना मोफत तांदूळ देण्यासह ३९ प्रस्ताव नायब राज्यपालांनी मंजूर करावेत, अशी त्यांची मागणी आहे. या आंदोलनात काँग्रेस व द्रमुकचे आमदाराही सहभागी झाले आहेत.

 The Chief Minister of Puducherry also lied against Kiran Bedi for the next day | किरण बेदींच्या निषेधार्थ पुडुच्चेरीच्या मुख्यमंत्र्यांचे दुसऱ्या दिवशीही धरणे

किरण बेदींच्या निषेधार्थ पुडुच्चेरीच्या मुख्यमंत्र्यांचे दुसऱ्या दिवशीही धरणे

Next

पुडुच्चेरी : दिल्ली सरकार व नायब राज्यपालांच्या अधिकारांवरून वादंग सुरू असतानाच तसाच संघर्ष पुडुच्चेरीमध्येही उद्भवला आहे. पुडुच्चेरी सरकारने दिलेल्या प्रस्तावांबाबत नायब राज्यपाल किरण बेदी यांनी नकारात्मक भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ त्यांच्या राजभवनासमोर मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी व त्यांच्या सर्व मंत्र्यांनी सलग दुसºया दिवशी गुरुवारीही धरणे आंदोलन सुरूच ठेवले आहे.
किरण बेदींचा निषेध करण्यासाठी काळे कपडे परिधान केलेले व्ही. नारायणस्वामी व त्यांचे मंत्री बुधवारी रात्री राजभवनासमोरच झोपले. नागरिकांना मोफत तांदूळ देण्यासह ३९ प्रस्ताव नायब राज्यपालांनी मंजूर करावेत, अशी त्यांची मागणी आहे. या आंदोलनात काँग्रेस व द्रमुकचे आमदाराही सहभागी झाले आहेत.
राज्यपाल किरण बेदी दिल्लीहून २0 फेबूवारीला पुडुच्चेरीला परतणार असून त्यांनी मुख्यमंत्र्यांना २१ फेब्रुवारीला चर्चेसाठी बोलावले आहे. सरकारने दिलेले प्रस्ताव नायब राज्यपाल मंजूर करेपर्यंत धरणे सुरू ठेवण्याचा निर्धार काँग्रेस व द्रमुकने केला आहे. पुडुच्चेरीला राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठीही याआधी मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी ५ जानेवारी रोजी संसदेसमोरही धरणे धरले होते.

सतत वाद सुरूच
किरण बेदी नायब राज्यपाल बनल्यापासून त्यांचे सरकारशी सतत वाद झडत असतात. नारायणस्वामी म्हणाले की, हेल्मेटसक्ती करण्याआधी एक महिना त्याबाबत जनजागृती मोहीम राबविणे गरजेचे होते. पण आता बाइकस्वारांकडून दंड वसूल केला जात आहे.

Web Title:  The Chief Minister of Puducherry also lied against Kiran Bedi for the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.