मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ठेवले अर्थ खाते, कर्नाटकमध्ये खाते वाटप जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 09:47 AM2023-05-30T09:47:45+5:302023-05-30T09:49:55+5:30

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना खात्यांचे वाटप केले आहे.

chief minister Siddaramaiah Finance department Allocation departments in Karnataka cabinet | मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ठेवले अर्थ खाते, कर्नाटकमध्ये खाते वाटप जाहीर

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ठेवले अर्थ खाते, कर्नाटकमध्ये खाते वाटप जाहीर

googlenewsNext

बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना खात्यांचे वाटप केले आहे. मुख्यमंत्र्यांकडे अर्थ तर पाटबंधारे आणि बंगळुरू शहर विकास विभाग उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यासह १० मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर, आणखी २४ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला.

मुख्यमंत्र्यांकडे काय? 
अर्थ विभागाव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ कार्य, कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभाग, गुप्तचर, माहिती, आयटी आणि बीटी, पायाभूत सुविधा विकास आणि वाटप न झालेले सर्व विभाग स्वत:कडे कायम ठेवले आहेत.

आधी दिली हमी, आता लावताहेत अटी...
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आश्वासन दिलेल्या पाच हमींवर आता सत्तेत आल्यानंतर ते अटी जोडून मतदारांची फसवणूक करत आहेत, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते बसवराज बोम्मई यांनी सोमवारी केला.

शिवकुमार यांच्याकडे?
शिवकुमार यांना पाटबंधारे विभागासह बंगळुरू शहर विकास, बृहत बंगळुरू महानगरपालिका, बंगळुरू विकास प्राधिकरण, बंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळ, बंगळुरू महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ही खाती मिळाली आहेत.

कुणाला कोणते खाते?
  जी. परमेश्वर गृह विभाग
  एम. बी. पाटील मोठे व मध्यम उद्योग विभाग
  के. जे. जॉर्ज ऊर्जा विभाग
  एच. के. पाटील कायदा आणि संसदीय कामकाज, विधि आणि पर्यटन 
  के. एच. मुनियप्पा अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार
  प्रियांक खर्गे ग्रामविकास व पंचायतराज 
  शिवानंद पाटील वस्त्रोद्योग व ऊस विकास 
  मधू बंगारप्पा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण
  एम.सी. सुधाकर उच्च शिक्षण
  एन. एस. बोसेराजू लघु पाटबंधारे, विज्ञान आणि तंत्रज्ञान

Web Title: chief minister Siddaramaiah Finance department Allocation departments in Karnataka cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.