तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव बचावले, हेलिकॉप्टर प्रवासात वायरलेस बॅटरीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:41 IST2018-02-28T00:41:48+5:302018-02-28T00:41:48+5:30
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मंगळवारी ज्या हेलिकॉप्टरमधून करीमनगर ते पेड्डपल्ली असा प्रवास करणार होते, त्यात ठेवलेल्या एका बॅगेतून धूर येत असल्याचे त्यांच्या सोबतच्या अधिका-याच्या लक्षात आले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव बचावले, हेलिकॉप्टर प्रवासात वायरलेस बॅटरीला आग
हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मंगळवारी ज्या हेलिकॉप्टरमधून करीमनगर ते पेड्डपल्ली असा प्रवास करणार होते, त्यात ठेवलेल्या एका बॅगेतून धूर येत असल्याचे त्यांच्या सोबतच्या अधिका-याच्या लक्षात आले. सुरक्षा रक्षकाने ती बॅग हेलिकॉप्टरमधून तत्काळ बाहेर फेकून दिली.
या प्रसंगावधानतेमुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री संभाव्य अपघातातून सुदैवाने बचावले. एका शेतक-यांच्या मेळाव्याला उपस्थित राहून के. चंद्रशेखर राव पेड्डापल्लीला हेलिकॉप्टरला रवाना होत होतो. ज्यातून धूर येत होता, ती बॅग सुरक्षा रक्षकाने हेलिकॉप्टरपासून सुमारे १०० मीटर दूर पळत जाऊन फेकून दिली. सुदैव हे की, हेलिकॉप्टरने उड्डाण करण्याच्या आधीच बॅगेचा मामला लक्षात आला. या बॅगेत आग कशाने लागली, याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, तिच्यामध्ये ठेवलेल्या वायरलेस सेटच्या बॅटरीला आग लागली, असा कयास आहे.