कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करणार, मुख्यमंत्री विजयन यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 04:00 AM2018-10-27T04:00:44+5:302018-10-27T04:01:03+5:30

शबरीमाला मंदिरात महिला प्रवेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकार बांधील असून यापुढे महिलांना मंदिर प्रवेशापासून रोखण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी स्पष्ट केले.

Chief Minister Vijayan Singh's assurance to implement the court's order | कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करणार, मुख्यमंत्री विजयन यांची ग्वाही

कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करणार, मुख्यमंत्री विजयन यांची ग्वाही

Next

तिरुवनंतपुरम : शबरीमाला मंदिरात महिला प्रवेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकार बांधील असून यापुढे महिलांना मंदिर प्रवेशापासून रोखण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी स्पष्ट केले. न्यायालयाच्या आदेशाला विरोध करीत १७ आॅक्टोबर रोजी हिंसक निदर्शने करणाऱ्यांना लोकांची धरपकड करण्यात येत असून राज्यभरात २ हजारांहून अधिक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या आदेशाला केरळमध्ये ठिकठिकाणी तीव्र विरोध होत असून १७ आॅक्टोबर रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिर प्रवेशासाठी आलेल्या महिलांना रोखण्याचे हिंसक प्रकार घडले होते. या हिंसक निदर्शनावरून मुख्यमंत्री विजयन यांनी भाजपा आणि राष्टÑीय स्वयंसेवक संघावर दोषारोप केले आहेत. केंद्रातील सत्तारुढ भाजपा सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार निर्णय आणि सन्मान झुगारू पाहत आहे, असा आरोप करून विजयन म्हणाले की, संघाने समाजकंटक आणि गुन्हेगारांचा अड्डा म्हणून अयप्पा मंदिराचा वापर केला. (वृत्तसंस्था)
>धरपकड मोहीम
हिंसक निदर्शनानंतर केरळ पोलिसांनी शुक्रवारी राज्यभरात धरपकड करून २,०६१ जणांना ताब्यात घेतले असून याप्रकरणी ४५२ गुन्हे दाखल केले आहेत. अनेक निदर्शकांची घरातूनच उचलबांगडी करण्यात आली. १४ महसुली जिल्ह्यात पोलिसांनी धरपकड मोहीम हाती घेतली आहे.

Web Title: Chief Minister Vijayan Singh's assurance to implement the court's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.