शहीदाच्या अंत्ययात्रेत मुख्यमंत्र्यांचं मदतीचं राजकारण
By admin | Published: February 17, 2016 02:51 PM2016-02-17T14:51:59+5:302016-02-17T14:51:59+5:30
शहीद जवान गणेशन यांच्या शवपेटीजवळ मुख्यमंत्री जयललिता यांचा फोटो दाखवल्याने संताप व्यक्त केला जात आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 17 - सियाचीनमधील हिमस्खलनात शहीद झालेले जवान गणेशन यांच्यावरील अंत्यसंस्कारावेळी मदतीचा चेक देताना शवपेटीजवळ मुख्यमंत्री जयललिता यांचा फोटो दाखवल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
सियाचीनमध्ये शहीद झालेले जवान गणेशन यांच्यावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंसस्कारावेळी सरकारतर्फे मदतीचा चेक घेऊन आलेले राज्यमंत्री सेल्लूर राजू यांनी मदतीचा चेक देताना मदत आमच्याच सरकारने केली आहे हे दाखवण्यासाठी चक्क शवपेटीसमोरच मुख्यमंत्री जयललिता यांचा फोटो ठेवला.सेल्लूर राजू एवढ्यावरच थांबले नाहीत तर शहीद गणेशन यांच्या आईला जयललिता यांचा फोटोदेखील दाखवला जेणेकरुन त्यांना मदत कोणी केली हे कळाव आणि याचं श्रेय दुस-या कोणाला जाऊ नये.
उपस्थितांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत अशा प्रकारे शहीदाच्या शवपेटीसमोर राजकारण करणं लाजिरवाणी गोष्ट असल्याचं म्हणल आहे.
तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वोपतरी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री जयललिता यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अण्णाद्रुमुक करत आहे. गेल्या आठवड्यात अण्णाद्रमुक पक्षाने जयललिता यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला होता ज्यामध्ये जोडप्यांना जयललिता यांचे स्टीकर असणारे डेहबँण्ड़ वापरण्यास सांगितले होते.