काय सांगता? तीन पायांच्या बाळाचा जन्म, दैवी चमत्कार समजून लोकांची मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 01:43 PM2020-10-05T13:43:53+5:302020-10-05T13:54:20+5:30
Three Legs Child in Uttar Pradesh : तीन पायांचं बाळ पाहण्यासाठी लोक दूरदूरवरून येत आहेत. सर्वत्र फक्त या बाळाचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.
गाजीपूर - उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे. तीन पाय असलेल्या बाळाचा जन्म झाला आहे. या घटनेने सर्वच हैराण झाले असून बाळाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. अनेकांनी हा दैवी चमत्कार असल्याचं म्हटलं आहे. तर काही जण मुलाच्या पाया पडण्यासाठी घरी मोठी गर्दी करत आहेत. तीन पायांचं बाळ पाहण्यासाठी लोक दूरदूरवरून येत आहेत. सर्वत्र फक्त या बाळाचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या गाजीपूर जिल्ह्यातील तियरा गावात ही घटना घडली आहे. तियरा गावात राहणाऱ्या प्रियंका देवी यांनी 29 सप्टेंबर रोजी तीन पायांच्या बाळाला जन्म दिला. मुलाचा तिसरा पाय त्याच्या गुप्तांगाशी जोडला गेलेला आहे. या पायाला सहा बोटे आहेत. मुलाचं आरोग्य उत्तम असून ते सामान्य बाळासारखं आहे. तीन पायांचं बाळ हा सध्या सर्वत्र कुतुहलाचा विषय झाला आहे.
वयाच्या 18 व्या वर्षी मुलालाही काढलं जातं गावाबाहेरhttps://t.co/5l7LvtaMUD#women
— Lokmat (@MiLOKMAT) October 5, 2020
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागितली मदत
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाचे वडील विवेकानंद हे गरीब आहेत. या मुलावर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. आपल्या मुलाच्या उपचारासाठी लोकांनी आपल्याला मदत करावी, असं त्यांचं म्हणणे आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे देखील मदत मागितली आहे. सहाय्यक मुख्य वैद्यकीय अधिकारी उमेश कुमार यांनी हा विशिष्ट प्रकारचा आजार असून या आजाराला कंजेनिटल अनोमिली असं म्हणतात अशी माहिती दिली आहे.
बाळाच्या जन्मानंतर कुटुंबीयांना धक्का
उमेश कुमार यांनी या आजारात रुग्णांवर तपासणीनंतर उपचार होतात अशी माहिती दिली आहे. गरोदर महिला जर रेडिएशनच्या संपर्कात आली किंवा एखाद्या औषधाचा साइड इफेक्ट झाल्यास अशा प्रकारचं मूल जन्माला येतं असं देखील कुमार यांनी म्हटलं आहे. बाळाच्या जन्मानंतर कुटुंबीयांना देखील थोडा धक्का बसला आहे. त्याच्या उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची चिंता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड फक्त 150 रुपये, डिसेंबरपासून सुरू होणार 'ही' स्वस्त सेवाhttps://t.co/UX0VPfbxGP#MRI#Dialysis#health
— Lokmat (@MiLOKMAT) October 4, 2020