मुलाने आईच्या कानशिलात लगावल्याने जागेवरच मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 01:09 PM2021-03-17T13:09:56+5:302021-03-17T13:10:33+5:30

दिल्लीत सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांना बिंदापूर परिसरात भांडण झाल्याची माहिती कंट्रोल रुमद्वारे मिळाली. त्यामुळे बिंदापूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

The child died on the spot after being hit in the ear by the child, the video went viral in Delhi | मुलाने आईच्या कानशिलात लगावल्याने जागेवरच मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

मुलाने आईच्या कानशिलात लगावल्याने जागेवरच मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

Next

नवी दिल्ली - आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकारांच्या नंतर शिकणे अ आ ई... ही उजळणी आपण लहानपणापासूनच ऐकली आहे, म्हटली आहे. आपण आईला देवाच्यास्थानी मानतो, तिची पूजा करतो. मात्र, आईच्या उतारवयात तिच्यावर धावून जाणाऱ्या मुलाला काय म्हणायचं. आईवर हात उगारणाऱ्या लेकाचा काय म्हणायचं. राजधानी दिल्लीत अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलाने चक्क आईच्या कानशिलात लगावली. त्यामध्ये वृद्ध आईचा मृत्यू झाला आहे. 

दिल्लीत सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांना बिंदापूर परिसरात भांडण झाल्याची माहिती कंट्रोल रुमद्वारे मिळाली. त्यामुळे बिंदापूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी, घटनास्थळावर राहणाऱ्या 38 वर्षीय सुधारा नामक महिलेनं घडलेली घटना पोलिसांना सांगितली. तसेच, आम्ही आपापसात ती भांडण मिटवल्याचेही तिने म्हटले. ग्राऊंड फ्लोअरला गाडी पार्किंग करण्यावरुन हा वाद झाला होता. महिलेनं स्पष्टीकर दिल्यानंतर पोलीस घटनास्थळावरुन निघून गेले. मात्र, या महिलेचा आणि तिच्या पतीचा ग्राऊंड फ्लोअरला राहणाऱ्या वृद्ध महिलेसोबत पुन्हा वाद झाला. 

वयोवृद्ध महिला अवतार कौर वरच्या मजल्यावर राहणाऱ्या व्यक्तीची आई होती. या वृद्ध महिलेचा पार्किंगच्या कारणामुळे तिच्याच मुलाशी आणि सुनेसोबत वाद होत होता. दोघांमध्ये मोठं भांडण झालं. या वादातूनच मुलगा रणबीरने वृद्ध आईच्या कानशिलात लगावली. मुलाने उचललेला हात सहन न झाल्याने वृद्ध महिला खाली कोसळली. त्यानंतर, वृद्धास रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. ही संपूर्ण घटना त्या पार्कींग परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रुग्णालयात या घटनेची नोंद नव्हती, किंवा पोलिसातही तक्रार दाखल नव्हती. मात्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन आरोपी मुलाविरुद्ध 304 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: The child died on the spot after being hit in the ear by the child, the video went viral in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.