बालमजुरी माझ्या हयातीतच नष्ट करणार -सत्यार्थी
By Admin | Published: January 9, 2016 03:33 AM2016-01-09T03:33:03+5:302016-01-09T03:33:03+5:30
बालमजुरी पूर्णत: नष्ट झाली असल्याचे लोक मानतात; पण अद्यापही ही कुप्रथा सुरू आहे. माझ्या हयातीतच मी ही कुप्रथा नष्ट करील, असा निर्धार नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी बोलून दाखवला.
नवी दिल्ली : बालमजुरी पूर्णत: नष्ट झाली असल्याचे लोक मानतात; पण अद्यापही ही कुप्रथा सुरू आहे. माझ्या हयातीतच मी ही कुप्रथा नष्ट करील, असा निर्धार नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी बोलून दाखवला.
सत्यार्थी यांनी लिहिलेल्या ‘आझाद बचपन की ओर’ या हिंदीतील पुस्तकाचे गुरुवारी प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते. भारतच नव्हे, तर जगभरातील मुलांच्या अधिकारांसाठीचा लढा आणि बालमजुरीचे उच्चाटन हे माझ्या आयुष्याचे ‘मिशन’ बनले आहे. माझ्या हयातीतच हे मिशन मी पूर्ण करून दाखवेल, असे ते म्हणाले. ‘आझाद बचपन की ओर’ या पुस्तकात सत्यार्थी यांच्या तीन दशकांचा संघर्ष, न्यायालयीन निर्णय व धोरणात्मक निर्णयाची समीक्षा करणाऱ्या लेखांचा समावेश आहे. हे माझे पहिलेवहिले पुस्तक आहे. मातृभाषेत ते साकारण्याचा आनंदही वेगळाच आहे, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)