बालविवाह आपोआप बेकायदेशीर होणार नाही - मद्रास उच्च न्यायालय
By admin | Published: March 7, 2016 08:08 AM2016-03-07T08:08:18+5:302016-03-07T08:15:50+5:30
बालविवाह आपोआप बेकायदेशीर ठरवता येणार नाही असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने दिला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मदुराई, दि. ७ - बालविवाह आपोआप बेकायदेशीर ठरवता येणार नाही असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने दिला आहे. बालविवाह झाला असेल तर लग्नाचं कायदेशीर वय पुर्ण केल्यावर दोघांपैकी एकाने कौंटुबिक न्यायालयातून घटस्फोट घेतल्याचा पुरावा सादर करणे गरेजेचे आहे त्यानंतर तो विवाह बेकायदेशीर ठरवला जाईलं असं न्यायालयानं सांगितलं आहे.
मदुराई उच्च न्यायालयात महिलेने घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 1995मध्ये माझं लग्न झालं होतं तेव्हा मी अल्पवयीन होते त्यामुळे मला घटस्फोट देण्यात यावा अशी मागणी महिलेने याचिकेतून केली होती. उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने ही याचिका फेटाळत बालविवाह आपोआप बेकायदेशीर ठरवता येत नसल्याचं सांगितलं आहे.
न्यायालयाने हा निर्णय देताना हिंदू विवाह कायद्याचादेखील उल्लेख केला आहे. तसंच याप्रकरणी ससंदेत लवकरच कायदा आणला जाईल अशी आशाही व्यक्त केली आहे.