बालमृत्यू प्रकरण : योगी सरकारकडून द्वेषपूर्वक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 02:47 AM2018-06-25T02:47:00+5:302018-06-25T02:47:05+5:30

उत्तर प्रदेश सरकारच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे अनेक निष्पाप बालकांना मृत्यूमुखी पडावे लागले

Child Matters: Harmful action by Yogi Sarkar | बालमृत्यू प्रकरण : योगी सरकारकडून द्वेषपूर्वक कारवाई

बालमृत्यू प्रकरण : योगी सरकारकडून द्वेषपूर्वक कारवाई

Next

मुंबई : उत्तर प्रदेश सरकारच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे अनेक निष्पाप बालकांना मृत्यूमुखी पडावे लागले, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न केले. वैयक्तिक खर्च सोसून अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. मात्र सत्य बाहेर येण्याच्या भीतीपोटी योगी आदित्यनाथ सरकारने आपल्यावर द्वेषाने खोटे गुन्हे दाखल केले. परंतु आपला भारतीय न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून त्यांच्या षडयंत्रातून आपली निर्दोष मुक्तता होईल, असा आशावाद गोरखपूर रुग्णालयातील डॉ. काफील खान यांनी येथे रविवारी व्यक्त केला.
स्टुडंट इस्लामिक आॅरगनायझेनच्या (एसआयओ) मुंबई शाखेतर्फे कुर्ला येथील कार्यालयात आयोजिलेल्या चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी जातीयावादी शक्ती विरोधात देशभरात मोहीम राबवून नागरिकांमध्ये जनजागृती व एकजुटता निर्माण करणार असल्याचे स्पष्ट केले.
गेल्यावर्षी गोरखपूर रुग्णालयात आॅक्सिजनच्या सिलेंडरच्या कमतरतेमुळे अनेक बालके मृत्यूमुखी पडली होती. त्यावेळी बचावकार्यात मोलाची भूमिका बजाविणाºया डॉ. काफिल खान यांनाच या प्रकरणात दोषी ठरवून गुन्हे दाखल केले होते. न्यायालयाने त्यांच्यावरील सर्व गंभीर गुन्हे मागे घेतले आहेत. एक प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. सध्या जामीनावर बाहेर असलेले डॉ. काफील देशाच्या विविध भागात जावून योगी सरकारची गैरकृत्ये चव्हाट्यावर आणित आहेत. ते म्हणाले, गोरखपूर घटनेचे वार्तांकन सर्व जगासमोर उघड झाले आहे. काहींचा अपवाद वगळता प्रसार माध्यमांनी सर्व प्रकार उघड केला.

Web Title: Child Matters: Harmful action by Yogi Sarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.