लज्जास्पद! WhatsApp चाइल्ड पॉर्नोग्राफी ग्रुपमध्ये सर्वाधिक भारतीय, अमेरिका-चीनपर्यंत कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 06:42 PM2018-03-13T18:42:47+5:302018-03-13T18:45:44+5:30

अल्पवयीन मुलांच्या अश्लील चित्रफिती बनवून त्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल...

Child Pornography Racket Case: CBI probe revealed that the Whats app group had 119 members from 40 countries | लज्जास्पद! WhatsApp चाइल्ड पॉर्नोग्राफी ग्रुपमध्ये सर्वाधिक भारतीय, अमेरिका-चीनपर्यंत कनेक्शन

लज्जास्पद! WhatsApp चाइल्ड पॉर्नोग्राफी ग्रुपमध्ये सर्वाधिक भारतीय, अमेरिका-चीनपर्यंत कनेक्शन

Next

नवी दिल्ली : अल्पवयीन मुलांच्या अश्लिल चित्रफिती बनवून त्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल करणारी आंतरराष्ट्रीय टोळी सीबीआयने गेल्या महिन्यात उद्ध्वस्त केली होती. लाजीरवाणी गोष्ट म्हणजे या ग्रूपमध्ये सर्वाधिक मेंबर्स हे भारतीय होते अशी माहिती सीबीआयच्या चौकशीमध्ये समोर आली आहे. 40 देशांचे एकूण 119 सदस्य या ग्रुपमध्ये होते, त्यापैकी सर्वाधिक सदस्य एकट्या भारतातून होते. भारताखालोखाल पाकिस्तान आणि अमेरिकेचे सदस्य होते अशी माहिती सीबीआयने दिली.  



गेल्या महिन्यात या प्रकरणी उत्तर प्रदेशातील कन्नौजमधील निखील वर्मा (२०) या व्हॉट्सअॅप अॅडमिनला अटक केली होती. हा तरुण ‘किड्सएक्सएक्सएक्स’ हा व्हॉट्सअॅप ग्रुप चालवत होता. या ग्रुपमध्ये अमेरिका, चीन, न्यूझिलंड, मेक्सिको, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ब्राझिल, केनिया आणि श्रीलंकेतील 119 सदस्य असल्याचेही सीबीआयने सांगितले. 

अल्पवयीन मुलांच्या अश्लिल चित्रफिती चित्रीत करुन या व्हॉट्सअप ग्रुपवर झळकविल्या जातात अशी माहिती मिळाल्यावरुन सीबीआयने मुंबई, दिल्ली, नोइडा, उत्तर प्रदेशातील कनौज येथील पाच ठिकाणी छापे मारले. निखिल वर्माच्या चौकशीदरम्यान अशी माहिती उजेडात आली की, त्याने सुरु केलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अमेरिका, चीन, न्यूझीलंड, मेक्सिको, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ब्राझिल, केनिया, नायजेरिया, श्रीलंका या देशांसह भारतातल्या अन्य भागांतील मिळून ११९ सदस्य आहेत. सीबीआयने या प्रकरणी मारलेल्या छाप्यांदरम्यान अनेक मोबाइल फोन, लॅपटॉप, हार्डडिस्क व अन्य डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.

निखिल वर्मा याच्यासह दिल्लीतील नफीस रझा, झाहिद, मुंबईतील सत्येंद्र ओमप्रकाश चौहान व नोईडातील आदर्श यांनाही सीबीआयने अटक केली आहे. व्हॉट्सअप सर्व्हिलियन्सचा वापर न करता सीबीआयने आपल्या खब-यांमार्फत गेले तीन महिने या प्रकरणाची खडानखडा माहिती मिळवली. या अश्लील चित्रफिती जिथून अपलोड केल्या जात असत त्या संगणकाच्या व मोबाइल फोनच्या इंटरनेट जोडणीचे आयपी अ‍ॅड्रेसेस शोधून त्या त्या ठिकाणी सीबीआयची पथके गेली व त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी अटक केलेल्यांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या आरोपींचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास त्यांना सात वर्षांचा कारावास व १० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. या व्हॉट्सअप ग्रुपमधील भारतात असलेले व विदेशातील सदस्यांचाही सीबीआय शोध घेत आहे.
 
    

Web Title: Child Pornography Racket Case: CBI probe revealed that the Whats app group had 119 members from 40 countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.