बोअरवेलमधून चिमुरड्याची २० तासांनी सुखरूप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 06:44 AM2024-04-05T06:44:11+5:302024-04-05T06:44:22+5:30
Karnataka News: कर्नाटकात बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षांच्या बालकाला २० तासांच्या मोहिमेनंतर बाहेर काढण्यात आले. बुधवारी संध्याकाळी ६:३० च्या सुमारास लचायन गावात १६ फूट खोल बोअरवेलमध्ये बालक पडल्यानंतर तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले होते.
बेंगळूरू - कर्नाटकात बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षांच्या बालकाला २० तासांच्या मोहिमेनंतर बाहेर काढण्यात आले. बुधवारी संध्याकाळी ६:३० च्या सुमारास लचायन गावात १६ फूट खोल बोअरवेलमध्ये बालक पडल्यानंतर तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले होते.
सात्विक सतीश मुजगोंड हा बालक घराजवळ खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला. सात्विकच्या रडण्याचा आवाज ऐकून कोणीतरी तातडीने कुटुंबीयांना माहिती दिल्याने ही बाब उघडकीस आली.
या मुलाला वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी बोअरवेलच्या समांतर २१ फूट खोल खड्डा खोदला होता. मुलाला बाहेर काढताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. घटनास्थळी ऑक्सिजनसह वैद्यकीय पथक तैनात होते. सुटका झाल्यानंतर बालकाला इंडी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ३२ जणांच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.