कौतुकास्पद! लग्नाला 15 वर्षे झाली पण मूल नाही; शेतकरी दांपत्याने वासराला घेतलं दत्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 04:24 PM2020-12-18T16:24:00+5:302020-12-18T16:28:27+5:30

Farmer Adopts Calf as Son : विशेष म्हणजे दांपत्याने आपल्या वासराचं मुंडण केलं. या कार्यक्रमाला त्यांनी जवळपास 500 हून अधिक लोकांना आमंत्रित केलं

childless up farmer adopts calf as son invites over 500 guests for symbolic mundan | कौतुकास्पद! लग्नाला 15 वर्षे झाली पण मूल नाही; शेतकरी दांपत्याने वासराला घेतलं दत्तक

कौतुकास्पद! लग्नाला 15 वर्षे झाली पण मूल नाही; शेतकरी दांपत्याने वासराला घेतलं दत्तक

Next

नवी दिल्ली - लग्नाला काही वर्षे झाली तरी अनेकांना मूल नसल्याने ते मूल दत्तक घेतात. मात्र एका शेतकरी दांपत्याने अनोखा आदर्श निर्माण केला आहे. लग्नाला 15 वर्षे झाली पण इतक्या वर्षांनंतरही उत्तर प्रदेशमधीलशेतकरी विजयपाल आणि त्यांची पत्नी राजेश्वरी देवी यांना मूल नव्हतं. या दांपत्याने वासराला मुलाच्या रुपात दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. 

शेतकरी दांपत्याने वासरू दत्तक घेतलं असून "ललतू बाबा" असं त्याचं नाव ठेवलं आहे. विशेष म्हणजे या दांपत्याने आपल्या या वासराचं बुधवारी मुंडण केलं. या कार्यक्रमाला त्यांनी जवळपास 500 हून अधिक लोकांना आमंत्रित केलं होतं. दांपत्याने ललतू बाबाला गोमती नगरातील ललतू घाटावर घेऊन गेले. तेथे त्याचा मुंडण समारोह पार पडला. पुजाऱ्याने ललतू बाबा आणि त्याच्या आई-वडिलांना आशीर्वाद दिला. 

ललतूला मी नेहमीच माझा मुलगा मानत आलो आहे.  हे वासरू जन्माला आल्यापासूनच आमच्या सोबत आहे. आमच्यासाठी त्याचे प्रेम हे खरे आणि विनाअट आहे अशी प्रतिक्रिया विजयपाल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधताना दिली आहे. आम्हाला मुंडण कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाल्यानंतर आम्ही आश्चर्यचकित झालो असं एका गावकऱ्याने सांगितलं. दांपत्य आणि वासरू पाहून आम्हालाही आनंद झाल्याचं गावकऱ्याने सांगितलं आहे.

आई-वडिलांच्या निधनानंतर विजयपाल यांना आपल्या शाहजहानपूरमधील घरात एकटेपणा जाणवत होता. त्यांच्या दोन लहान बहिणींचाही विवाह झाला होता. गायीवर देखील आपले अतिशय प्रेम असल्याचं विजयपाल यांनी म्हटलं आहे. ललतूच्या आईला विजयपाल यांचे वडील घेऊन आले होते. गायीचा मृत्यू झाल्यानंतर हे वासरू एकटे पडले. याच कारणामुळे त्यांनी या वासराला मुलाच्या रुपात स्वीकारायचा निर्णय घेतला. जर आपण गायीला माता म्हणून मानत असू, तर मग गायीच्या वासराला आपला मुलगा का नाही मानू शकत असं विजयपाल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

​​​​​​

Web Title: childless up farmer adopts calf as son invites over 500 guests for symbolic mundan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.