मोलकरणीच्या मुलांचेही झाले कोडकौतुक
By admin | Published: August 20, 2015 10:10 PM2015-08-20T22:10:04+5:302015-08-20T22:10:04+5:30
पुणे: हुशार आईवडिलांच्या हुशार मुलांचे कौतुक सगळेच करतात, पण घरेलू काम करणार्यांच्या मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप कोण मारणार! बँक ऑफ बडोदा एम्प्लॉईज युनियन, सेवा सहयोग फाउंडेशन यांनी घरेलू कामगार संघाच्या सहकार्याने ही जबाबदारी घेतली मोलकरणींच्या गुणवंत मुलांचे कौतूक केले.
Next
प णे: हुशार आईवडिलांच्या हुशार मुलांचे कौतुक सगळेच करतात, पण घरेलू काम करणार्यांच्या मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप कोण मारणार! बँक ऑफ बडोदा एम्प्लॉईज युनियन, सेवा सहयोग फाउंडेशन यांनी घरेलू कामगार संघाच्या सहकार्याने ही जबाबदारी घेतली मोलकरणींच्या गुणवंत मुलांचे कौतूक केले. भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात तब्बल ४५ मोलकरणींच्या गुणवंत मुलांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. घरातील सार्या अडचणींवर मात करीत त्यांच्यातील कोणी १० वीत बाजी मारली होती तर कोणी १२ वीत उत्तम गूण संपादन केले होते. आई वडिल खस्ता खाऊन आपल्याला शिक्षण देत आहेत याची जाणीव या मुलांमध्ये दिसते आहे. उच्च शिक्षण घेत, मोठे अधिकारी होऊन ते आई वडिलांना तर सुखात ठेवतीलच पण अधिकारी झाल्यानंतर सामाजिक जाणीव ठेवून आपल्यासारख्याच इतरांनाही हात देतील अशी अपेक्षा कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष सावजी यांनी व्यक्त केली. घरेलू कामगार संघाचे संस्थापक रमणभाई शहा यांच्या स्मृतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय श्रमशोध मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब फडणवीस यांच्या हस्ते यावेळी शहा यांच्या कार्यावर आधारीत व्हिडिओ ध्वनीचित्रफितीचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला अण्णासाहेब धुमाळ, गणेश टिंगरे, संध्या देशपांडे, गौरी राजगूरू, गिरिजा शिरसीकर आदी उपस्थित होते. सुनंदा गडदे यांनी प्रास्तविक केले. शरद पंडीत यांनी सुत्रसंचालन केले. सुषमा नवले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)