सुट्यांमध्येही मुलांना माध्यान्य भोजन?, मनुष्यबळ विकास मंत्रालयाची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 05:23 AM2017-10-28T05:23:06+5:302017-10-28T05:23:18+5:30

नवी दिल्ली : शाळांना सुट्या असतानाही विद्यार्थ्यांना माध्यान्य भोजन देण्याची व्यवस्था करणे शक्य आहे का हे शोधले जात आहे.

Children's Meal Foods in Vacation ?, Ministry of Human Resource Development | सुट्यांमध्येही मुलांना माध्यान्य भोजन?, मनुष्यबळ विकास मंत्रालयाची चाचपणी

सुट्यांमध्येही मुलांना माध्यान्य भोजन?, मनुष्यबळ विकास मंत्रालयाची चाचपणी

googlenewsNext


नवी दिल्ली : शाळांना सुट्या असतानाही विद्यार्थ्यांना माध्यान्य भोजन देण्याची व्यवस्था करणे शक्य आहे का हे शोधले जात आहे.
शाळांच्या सुट्यांमध्येही आम्ही गरिबातील गरीब विद्यार्थ्याला माध्यान्य भोजन देण्यासाठी काही पुढाकार घेण्यावर विचार करू शकतो, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत असलेल्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या विशेष सचिव रिना राय यांनी सांगितले.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, २०१३ च्या अंमलबजावणी परिषदेत रिना राय येथे बोलत होत्या. झारखंडमध्ये एका मुलीचा (११) उपासमारीमुळे नुकताच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माध्यान्य भोजन या मुलीला नाकारण्यात आलेले नव्हते. शाळांना सुट्या असल्यामुळे तिला ते मिळू शकले नाही व त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असे अधिकाºयाने सांगितले.

Web Title: Children's Meal Foods in Vacation ?, Ministry of Human Resource Development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.