चिमुरडीने बार्बी डॉलच्या माध्यमातून सांगितली तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी

By Admin | Published: June 17, 2017 10:59 AM2017-06-17T10:59:12+5:302017-06-17T10:59:12+5:30

दिल्ली हायकोर्टामध्ये एका पाच वर्षाच्या मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी बार्बी डॉलच्या माध्यमातून सांगितली आहे.

Chimrudie told through Barbie Dolls the story of the atrocities committed against her | चिमुरडीने बार्बी डॉलच्या माध्यमातून सांगितली तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी

चिमुरडीने बार्बी डॉलच्या माध्यमातून सांगितली तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 17-  दिल्ली हायकोर्टामध्ये एका पाच वर्षाच्या मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी बार्बी डॉलच्या माध्यमातून सांगितली आहे. बार्बी डॉलच्या माध्यमातून त्या चिमुरडीने सांगितलेली माहिती ग्राह्य धरत कोर्टाने आरोपीली तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली होती. द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. 
 
सेशन्स कोर्टात सुनावणीदरम्यान पीडित मुलगी वकिलांचे प्रश्न ऐकूनही घाबरत होती. प्रश्नाची उत्तर देत नव्हती. त्यामुळे आरोपीवरील दोष सिद्ध करणं कठीण जात होतं. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी वकिलांनी तिच्या हातात बार्बी डॉल दिली. सुनावणीदरम्यान तिने बार्बी डॉलच्या माध्यमातून नेमके काय अत्याचार झाले होते हे सांगितलं. नराधमाने कुठे स्पर्श केला असा प्रश्न विचारल्यावर तिने बार्बी डॉलच्या माध्यमातून उत्तर द्यायची. सेशन्स कोर्टाने या जबाबाच्या आधारे आरोपीला दोषी ठरवत शिक्षाही सुनावली होती.  कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाविरोधात आरोपीने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. पीडित मुलगी बचाव पक्षाच्या वकिलांच्या प्रश्नांना नीट उत्तर देऊ शकत नव्हती असं आरोपीचं म्हणणं होतं. दिल्ली हायकोर्टात याप्रकरणाची सुनावणी दरम्यान हायकोर्टाने आरोपीचा दावा फेटाळून लावला. वकिलांच्या प्रश्नांनी मुलगी घाबरत होती. पण बार्बी डॉलच्या माध्यमातून काय अत्याचार झाले हे निदर्शनास आणून दिलं होतं असे हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे.  दरम्यान, हायकोर्टाने नराधमाच्या तुरुंगावासाची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे. 
 
काय आहे घटना ?
 
जुलै 2014 मध्ये ही घटना घडली आहे.. दिल्लीमध्ये एका नराधमाने पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केला होता. पीडित मुलगी तिच्या भावासोबत शाळेत जात असताना आरोपीने तिला रस्त्यात थांबललं. नंतर त्या आरोपीने चिमुरडीच्या भावाला 10 रूपये दिले आणि दुकानातून चॉकलेट आणायला सांगितलं होतं. यानंतर तो चिमुरडीला घेऊन दिल्लीतील नरेला या भागात गेला होता. तिथे मुलीवर अत्याचार करुन तिला घराजवळ आणून सोडून दिलं होतं. मुलीच्या शेजारी राहणाऱ्या महिलेला पीडित मुलगी रस्त्यावर रडताना सापडली होती. त्या महिलेने मुलीला घरी नेलं. तिच्यासोबत नेमकं काय घडलं हे तिने सांगितलं नव्हतं. पण नंतर घडलेला सर्व प्रकार तिने आईला सांगितला. अत्याचाराच्या प्रसंगानंतर ती मुलगी अत्यंत शांत झाली. तिला मानसिक धक्का बसला होता. या घटनेचा परिणाम म्हणजे ती मुलगी वडिलांसोबत घरात एकटी राहायलाही घाबरत होती. 
 

Web Title: Chimrudie told through Barbie Dolls the story of the atrocities committed against her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.