इतिहासाची पुनरावृत्ती?; ५८ वर्षांनंतर पुन्हा 'त्याच' ठिकाणी भारत-चीनचं सैन्य आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 07:06 PM2020-05-18T19:06:23+5:302020-05-18T19:11:35+5:30
लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य आमनेसामने आल्यानं तणाव वाढला
नवी दिल्ली: लडाखमधल्या गालवन नदीच्या किनारी भागात चीननं अतिरिक्त लष्करी कुमक मागवली आहे. त्यामुळे तणाव वाढताना दिसत आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून भारतीय लष्करानंदेखील या भागात अतिरिफ्त फौजफाटा तैनात केला आहे. १९६२ मध्ये गालवान नदीचा भाग युद्धाच्या केंद्रस्थानी होता. गालवानला डोक्लाम होऊ देणार नाही, असं चीननं म्हटलं आहे. गालवानमधल्या परिस्थितीला भारतच जबाबदार असल्याचा आरोप चीननं केला आहे.
९ मे रोजी उत्तर सिक्कीममधल्या नाकू ला सेक्टरमध्ये भारत आणि चिनी सैन्य आमनेसामने झाली होती. त्यामुळे परिसरात तणाव वाढला. त्याचवेळी लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चिनी सैन्याची हेलिकॉप्टर्स घिरट्या घालताना दिसली. त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या सुखोई आणि इतर लढाऊ विमानांनी पेट्रोलिंग करण्यास सुरुवात केली.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनच्या हालचालींवर केंद्र सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. चीननं या भागातील सैन्याची कुमक वाढवल्यानं तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारताकडून गालवान नदीच्या आसपास मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आलं आहे. या भागात आधीही चीन आणि भारताचं सैन्य आमनेसामने आलं आहे. मात्र सध्या परिस्थिती गंभीर आहे. गेल्या आठवड्याभरापासून दोन्ही देशांचं सैन्य आमनेसामने उभं ठाकल्यानं तणाव वाढला आहे.
सद्यस्थितीत 'त्या' २० हजार कोटींच्या प्रकल्पाची गरजच काय?; ६० माजी अधिकाऱ्यांचं मोदींना पत्र
चीनला हवीय भारतातील भाजी; कोरोनाचा सामना करताना वाढवणार रोगप्रतिकारशक्ती
चीनमध्ये ऑक्टोबर महिन्यातच पसरला होता कोरोना; जागतिक स्पर्धेतील खेळाडूंचा धक्कादायक दावा