भारतासमोर चीन अन् पाकिस्तान टिकणार नाहीत! अमेरिकन F-35, रशियन Su-57 पेक्षाही मजबूत लढाऊ विमाने बनवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 14:23 IST2025-04-13T14:16:15+5:302025-04-13T14:23:22+5:30

भारत आता आपल्या हवाई दलाला बळकट करण्यासाठी स्वतःच्या निर्मित लढाऊ विमानांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे.

China and Pakistan will not survive in front of India! American F-35 will make fighter jets stronger than Russian Su-57 | भारतासमोर चीन अन् पाकिस्तान टिकणार नाहीत! अमेरिकन F-35, रशियन Su-57 पेक्षाही मजबूत लढाऊ विमाने बनवणार

भारतासमोर चीन अन् पाकिस्तान टिकणार नाहीत! अमेरिकन F-35, रशियन Su-57 पेक्षाही मजबूत लढाऊ विमाने बनवणार

भारत आता स्वत: लढाऊ विमाने बनवण्यासाठी मोठी तयारी करत आहे. जगातील काही देशांनी आधीच चौथ्या आणि पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने तयार केली आहेत. यापैकी अमेरिकेच्या एफ-३५ ची सर्वाधिक चर्चा झाली आहे. याशिवाय रशियाचे एसयू-५७ आणि अमेरिकेचे एफ-२१ देखील प्रसिद्ध आहेत.

भारत यापैकी एक जेट विमान देखील खरेदी करू करणार आहे, अशी चर्चा होती. पण आता भारत या परदेशी विमानांपेक्षा आपल्या स्वदेशी लढाऊ विमानांवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.

"कुराण आन्...!" NIA कोठडीत दहशतवादी तहव्वुर राणानं मागितल्या या तीन गोष्टी

मल्टीरोल फायटर एअरक्राफ्ट प्रकल्पांतर्गत भारताने यापूर्वी ११४ नवीन लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्लॅन केला होता. या योजनेत F-35, Su-57, F-21, ग्रिपेन, राफेल, युरोफायटर टायफून आणि F-15EX सारख्या परदेशी लढाऊ विमानांचा समावेश होता. पण ही योजना अनेक वर्षांपासून रखडली आहे आणि त्यात खूप विलंब होत आहे. यामुळे आता परदेशी विमानांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या देशात बनवलेल्या विमानांमध्ये सुधारणा करेल आणि त्यांना प्राधान्य देईल.

भारतीय हवाई दलाकडे ३१ लढाऊ स्क्वॉड्रन आहेत तर ४२.५ स्क्वॉड्रनची आवश्यकता आहे. जुनी मिग-२१ विमाने हळूहळू काढून टाकली जात आहेत. त्यामुळे, हवाई दल मजबूत ठेवण्यासाठी, भारत आता आपल्या स्वदेशी लढाऊ विमानांवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.

लढाऊ शस्त्रे बनवण्यासाठी प्राधान्य

भारत सरकार आणि संरक्षण मंत्रालयाने 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया' अंतर्गत देशात शस्त्रे आणि लढाऊ विमानांच्या निर्मितीला प्राधान्य दिले आहे. याअंतर्गत, भारत आता त्याच्या दोन स्वदेशी लढाऊ विमान प्रकल्पांवर अधिक लक्ष केंद्रित करेल. पहिला म्हणजे पाचव्या पिढीतील AMCA लढाऊ विमान आणि दुसरा म्हणजे चौथ्या पिढीतील तेजस Mk-2, भारतीय हवाई दल अधिक मजबूत व्हावे आणि इतर देशांवरील अवलंबित्व कमी व्हावे यासाठी सरकार या दोन्ही लढाऊ विमानांची संख्या वाढवण्याची योजना आखत आहे.

Web Title: China and Pakistan will not survive in front of India! American F-35 will make fighter jets stronger than Russian Su-57

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.