चीन सीमा: लडाखमध्ये भारताचे टेहळणी ड्रोन कोसळले; सर्व विमानोड्डाणे रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 08:53 PM2023-02-13T20:53:34+5:302023-02-13T20:53:58+5:30
लडाख हे संवेदनशील ठिकाण आहे. चीनची सीमा लागूनच आहे. अशा परिस्थितीत येथे कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
भारतीय सैन्याचे टेहळणी ड्रोन चीनच्या सीमेवर कोसळले आहे. लडाखमध्ये तातडीने अलर्ट जारी करण्यात आला असून सर्व नागरी उड्डाणे काही काळासाठी बंद करण्यात आली आहेत. हा ड्रोन नियमित टेहळणी करत असताना कोसळला आहे.
हा अपघात कोणत्या कारणाने झाला, ते समजलेले नाहीय. मात्र, ड्रोनच्या अपघातामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नागरी उड्डाणे बंद करण्यात आली आहेत.
लडाख हे संवेदनशील ठिकाण आहे. चीनची सीमा लागूनच आहे. अशा परिस्थितीत येथे कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. याच भागात गेल्या वर्षी उंच डोंगराळ भागात पाळत ठेवण्यासाठी ड्रोन पाठवण्यात आले होते. त्या ड्रोनच्या माध्यमातून प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जात होती. मात्र त्याच बॅचचा एक ड्रोन कोसळला आहे.
या कारणास्तव नागरी उड्डाणे काही काळासाठी बंद करण्यात आली आहेत. ती कधी सुरू होणार, याचे उत्तर मिळालेले नाही. पाळत ठेवणारे ड्रोन क्रॅश होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक ड्रोन कोसळले आहेत. डोंगराळ भागात सुरक्षिततेच्या दृष्टीने या ड्रोनचे महत्त्व खूप वाढले आहे. डीआरडीओही या दिशेने सातत्याने काम करत असून त्याच्या वतीने नवीन तंत्रज्ञान असलेले ड्रोन बनवले जात आहेत.