पँगाँग तलावावर चीनचा पूल तयार, चिंता वाढली; वाहतूक सुरू, सीमेजवळ येणार रणगाडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 05:29 AM2024-07-31T05:29:05+5:302024-07-31T05:29:58+5:30
या पुलावरून चीन सैन्याला ताबारेषेपर्यंत एक सरळ आणि छाेटा मार्ग मिळाला आहे.
लेह : पूर्व लडाखमध्येचीनने माेठ्या प्रमाणावर लष्करी पायाभूत सुविधा विकसित करण्यास सुरुवात केलेली असून या भागातील पॅंगाॅंग तलावावर चीनने ४०० मीटर पुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे. या पुलावरून वाहतूकदेखील सुरू करण्यात आली आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे चीनला रणगाडे तसेच सैन्याला कमी वेळेत सहज सीमेजवळ आणता येणार आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.
१९५८ पासून चीनने बळकावलेल्या भागात या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. पॅंगाँग तलावावर बांधण्यात आलेला पूल प्रत्यक्ष ताबारेषेजवळ आहे. या पुलावरून चीन सैन्याला ताबारेषेपर्यंत एक सरळ आणि छाेटा मार्ग मिळाला आहे.