चीनची मुजोरी! कंत्राट रद्द केले म्हणून भारतीय रेल्वेवर उच्च न्यायालयात खटला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 08:21 PM2020-07-18T20:21:04+5:302020-07-18T20:27:46+5:30
गलवान घाटीमध्ये भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केल्याने 20 जवान शहीद झाले होते. यानंतर चीनविरोधात भारतात संतापाची लाट उसळली होती. यामुळे #BoycottChina अंतर्गत पहिल्यांदा भारतीय रेल्वेने चीवर वार केला होता.
नवी दिल्ली : आपल्या पैशांच्या, मनुष्यबळ आणि शस्त्रास्त्रांच्या धाकावर चीन अवघ्या जगावर दादागिरी करत आहे. कोरोनामुळे चीन पुरता घेरला गेला असून भारतीय सैन्यावर हल्ला करून भारताला कायमचा धडा शिकविण्याचा डाव उलटा पडला आहे. यामुळे चीनच्या कंपन्यांची कंत्राटे रद्द करणे आणि अॅप बॅन करण्याचे पाऊल भारताने उचलले आहे. आता ड्रॅगनच्या शेपटावर पाय ठेवल्याने चीन चांगलाच हवालदिल झाला आहे.
गलवान घाटीमध्ये भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केल्याने 20 जवान शहीद झाले होते. यानंतर चीनविरोधात भारतात संतापाची लाट उसळली होती. यामुळे #BoycottChina अंतर्गत पहिल्यांदा भारतीय रेल्वेने चीवर वार केला होता. कानपूर आणि मुगलसरायमधील ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमध्ये चीनच्या कंपन्यांना दिलेले कंत्राट रद्द करून टाकले होते. यानंतर अन्य मंत्रालयांनी चीन विरोधात हे पाऊल उचलायला सुरुवात केली होती. या बंदीच्या लाटेनंतर सैरभैर झालेल्या चीनने भारतीय रेल्वेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे.
रेल्वेने 417 किमीच्या रेल्वेमार्गावर सिग्नल आणि दळणवळण यंत्रणा उभारणीसाठी हे कंत्राट दिले होते. मात्र, कामात वेग नसल्याचे कारण देत रेल्वेने हे कंत्राट रद्द केले होते. मालगाड्यांच्या ये-जा करण्यासाठी हा मार्ग उभारण्याचे काम सुरु होते. यासाठी 2016 मध्ये चीनच्या बिजिंग नॅशनल रेल्वे रिसर्च अँड डिझाईन इंस्टीट्यूटला हे काम देण्यात आले होते.
जागतिक बँकेची आडकाठी
हे कंत्राट 471 कोटी रुपयांचे होते. रेल्वेने सांगितले की, हे काम त्या कंपनीला 2019 पर्यंत पूर्ण करायचे होते. मात्र, आतापर्यंत केवळ 20 टक्केच काम करण्यात आले आहे. यामुळे हे कंत्राट रद्द करण्यात आल्याचे रेल्वेने म्हटले होते. महत्वाचे म्हणजे या प्रकल्पाला निधी पुरवठा हा जागतिक बँकेकडून केला जात होता. रेल्वेने हे कंत्राट रद्द केले असले तरीही जागतिक बँकेने हे कंत्राट रद्द करण्याबाबत नाहरकत दाखला दिलेला नाही, असे इंडियन एक्स्प्रेसने म्हटले आहे. मात्र, रेल्वेने यावर जागतिक बँकेच्या निर्णयाची आम्ही वाट पाहणार नसून अन्य़ प्रकल्पांना स्वत:च फंडिंग करणार असल्याचे म्हटले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या....
चॅलेंज! कोरोनावर जगात कोणीही लस शोधुदे; भारताशिवाय उत्पादन अशक्यच
आयकराच्या फॉर्म 26AS मध्ये मोठे बदल; करदात्यांनो जाणून घ्या फायद्याचे की तोट्याचे
Video: "सुशांतचा आत्मा स्वर्गात, त्याच्यासोबत महिलाही"; जगप्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्स्पर्टचा दावा
ब्रिटन गेमचेंजर ठरणार! मृत्यूच्या दाढेतील कोरोनाबाधितांना वाचविले; स्टेरॉईडची चाचणी यशस्वी
राजस्थान सत्तासंघर्षावर पहिल्यांदाच वसुंधराराजेंची प्रतिक्रिया; गेहलोतांना थेट मदतीचा झालेला आरोप
चीन चवताळला! दक्षिण समुद्रात घुसलेल्या अमेरिकेला दिले चोख प्रत्यूत्तर
लॉकडाऊनमध्ये भविष्याची चिंता; लोकांची या सरकारी योजनेकडे 'उडी', तुम्हीही विचार करा...