China Coronavirus : थोडीशी सर्दी... अन् लोक करतायत कोरोनाची तपासणी; रिपोर्टही आले पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 11:42 AM2020-02-19T11:42:53+5:302020-02-19T11:59:10+5:30

चीनमध्ये जो कोरोना व्हायरस पसरलेला आहे, तो नवीन व्हायरस आहे.

China Coronavirus : corona virus reports positive in delhi doctors says not panic | China Coronavirus : थोडीशी सर्दी... अन् लोक करतायत कोरोनाची तपासणी; रिपोर्टही आले पॉझिटिव्ह

China Coronavirus : थोडीशी सर्दी... अन् लोक करतायत कोरोनाची तपासणी; रिपोर्टही आले पॉझिटिव्ह

googlenewsNext
ठळक मुद्देजर तुम्ही कोरोना व्हायरसची तपासणी करत आहात आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, तर घाबरून जाऊ नका!ज्या कोरोना व्हायरसची तुम्ही तपासणी करत आहात, तो एक साधा व्हायरस आहे.चीनमध्ये जो कोरोना व्हायरस पसरलेला आहे, तो नवीन व्हायरस आहे. त्याचं नाव '2019 नोवल कोरोना वायरस' आहे. जो  COVID-19च्या नावानंही ओळखला जातो.

नवी दिल्लीः जर तुम्ही कोरोना व्हायरसची तपासणी करत आहात आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, तर घाबरून जाऊ नका! ज्या कोरोना व्हायरसची तुम्ही तपासणी करत आहात, तो एक साधा व्हायरस आहे. त्याला घाबरण्याची गरज नाही. धोका चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसचा आहे. देश आणि जगात पहिल्यापासून उपस्थित असलेल्या कोरोना व्हायरसचा धोका नाही. चीनमध्ये जो कोरोना व्हायरस पसरलेला आहे, तो नवीन व्हायरस आहे. त्याचं नाव '2019 नोवल कोरोना वायरस' आहे. जो  COVID-19च्या नावानंही ओळखला जातो. हा वायरस अद्याप दिल्लीत नाही. याची खातरजमा दिल्लीतल्या फक्त दोन प्रयोगशाळेत होत असून, एम्स आणि एनसीडीसीमध्ये याची तपासणी केली जाते. विनाकारण कोणीही तपासणी करू नका आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तरी घाबरून जाऊ नका. 

आरएमएलमध्ये पोहोचले असे रुग्ण
राम मनोहर लोहिया रुग्णालयातील श्वसन विभागाचे डॉक्टर दीपक यांनी सांगितलं की, दोन असे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले, ज्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. खरं तर हा जुन्या कोरोना व्हायरसचं संक्रमण होतं, जो आपल्या सोसायटीत पहिल्यापासूनच अस्तित्वात आहे. या व्हायरसचा प्रभाव नाममात्र आहे. अशातच लोकांनी तपास केल्यास त्यात पॉझिटिव्ह रिपोर्टही येऊ शकतात. परंतु तो सध्या प्रभावशाली असलेला कोरोना व्हायरस नाही, जो चीनमध्ये पसरलेला आहे. त्यामुळे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तरी घाबरून जाऊ नका. डॉक्टर दीपक सांगतात, आता लोक कोरोनाचं नाव ऐकूनच तपास करण्यासाठी येतात. असं करणं म्हणजे विनाकारण घाबरून जाण्याचा प्रकार आहे. 

China Coronavirus : 'कोरोना' चा भारताला फटका; औषधांच्या किमती वाढल्या

China Coronavirus : चीनमध्ये 'कोरोना'चा कहर, संक्रमण रोखण्यासाठी नोटांची सफाई?

  • 4 कोरोना व्हायरस आधीपासूनच सक्रिय

कोरोना कोणताही नवीन व्हायरस नाही. पहिल्यापासूनच तो सक्रिय आहे. एका कुटुंबासारखेच या व्हायरसचे अनेक प्रकार आहेत, जे पूर्ण जगात सक्रिय आहेत. सामान्यतः पहिल्यापासून कोरोनाचे 4 व्हायरस सक्रिय होते, परंतु ते साधारण व्हायरसप्रमाणे आहेत. या व्हायरसनं कोणतंही नुकसान होत नाही. तसेच संक्रमित व्यक्तीलाही हा व्हायरस शरीरात असल्याचं समजत नाही. अशातच तपास केल्यास रिपोर्ट पॉझिटिव्हसुद्धा येऊ शकतात. आजकाल दिल्लीत असे प्रकार पाहायला मिळत आहेत. जेव्हा लोक कोणत्या तरी खासगी प्रयोगशाळेत जाऊन तपास करत आहेत. ज्यात कोरोना पॉझिटिव्ह आल्यास लोकांना भीती वाटतेय. 

‘कोरोना’वरील लस विकसित करण्यात पुण्यातील " या " संस्थेला यश

७३ हजार लोकांना संसर्ग; कोरोनाचे १९०० बळी

  • चीनमधून आलेल्या लोकांनी राहावं अलर्ट

चीनमधून भारतात परतलेल्या लोकांनी अलर्ट राहण्याची गरज आहे. जर कोणी चीनशिवाय इतर देशात गेले असतील आणि आता परतले असतील, त्यांनीसुद्धा सतर्क राहिलं पाहिजे. अशा लोकांच्या लक्षणांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. सर्दी, खोकला, ताप आल्यास डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. परंतु ज्या लोकांमध्ये अशी लक्षणं दिसत नाहीत, त्यांनी तपासही करू नये, तसेच घाबरून जाण्याचीही गरज नाही. आरएमएलमधल्या दोन संशयित रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे दिल्लीत हा व्हायरस आल्याची खातरजमा झालेली नाही. आतापर्यंत 42 संशयित रुग्ण आरएमएलमध्ये दाखल करण्यात आले आहेत. सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. 

  • सामान्य कोरोना व्हायरस

229 ई अल्फा कोरोना व्हायरस
एनएल 63 अल्फा कोरोना व्हायरस
ओसी 43 बीटा कोरोना व्हायरस
एचकेयू 1 बीटा कोरोना व्हायरस

Web Title: China Coronavirus : corona virus reports positive in delhi doctors says not panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.