भारतीय लष्कराला सलाम! चीनच्या तज्ज्ञांनीही केलं भरभरून कौतुक!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 11:11 AM2020-06-11T11:11:46+5:302020-06-11T11:15:07+5:30
चीनने भारतीय सैन्याचं भरभरून कौतुक केलं आहे. भारतीय सैन्य हे उंचावरील लढायांसाठी चीनी सैन्यापेक्षा सरस असल्याचं म्हटलं आहे.
भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. असं असताना चीननेभारतीय सैन्याचं भरभरून कौतुक केलं आहे. भारतीय सैन्य हे उंचावरील लढायांसाठी चीनी सैन्यापेक्षा सरस असल्याचं म्हटलं आहे. ‘मॉडर्न वेपनरी’ मासिकाचे (Modern Weaponry magazine) ज्येष्ठ संपादक हुआंग गुओझी यांनी एक लेख लिहिला आहे. ‘द पेपर डॉट सीएन’ या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेल्या लेखामध्ये भारताची स्तूती करण्यात आली आहे. पठार आणि पर्वतरांगा असा दोन्ही ठिकाणी लढाई करू शकणारं अनुभवी सैन्य असलेला भारत जगातील सर्वात मोठा देश असल्याचं म्हटलं आहे.
हुआंग गुओझी यांनी भारताकडे जगातील सर्वात मोठे आणि उंचावरील युद्धांसाठी प्रशिक्षण देण्यात आलेलं अनुभवी सैन्य आहे. भारतीय सैन्याच्या या ताकदीपुढे अमेरिका, रशिया किंवा कोणत्याही युरोपियन देशांची शक्ती देखील तग धरू शकत नाहीत असं म्हटलं. तसेच 12 तुकड्यांमध्ये असणारे दोन लाख भारतीय सैनिक हे गिर्यारोहणाचे कौशल्य असणारी आणि पर्वतरांगांमध्ये यशस्वीपणे युद्ध करण्याची क्षमता असणारी जगातील सर्वात मोठी फौज आहे. 1970 पासून सातत्याने आपल्या सैन्यदलामधील सैनिकांची संख्या वाढवली आहे. भारत पर्वतरांगांमध्ये युद्ध करणाऱ्या 50 हजार सैनिकांची विशेष फौज तयार करण्यासंदर्भात तयारी करत असल्याची माहिती लेखात देण्यात आली आहे.
CoronaVirus News : "....तर पाच पट जास्त होणार कोरोनाचा प्रसार"https://t.co/Jkwyyoi43B#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia#rain#IIT
— Lokmat (@MiLOKMAT) June 11, 2020
चीनने केलेलं सैन्याचं कौतुक भारतासाठी विशेष मानलं जात आहे. गुओझी यांनी भारतीय सैन्याची माहिती देतान सियाचीनचं एक उदाहरण दिलं आहे. भारताने सियाचीन ग्लेशियरमध्ये पाच हजार मीटर उंचीवर टेहाळणी बुरुज उभारले आहेत. तेथे सहा ते सात हजार सैनिक तैनात असतात. जगातील सर्वात उंचीवरील चौकी ही 6749 मीटरवर आहे. भारताने परदेशातून तसेच स्वत: संशोधन करुन मोठ्या प्रमाणात अशा उंच ठिकाणी लढाई करण्यासाठी शस्त्र तयार केली आहेत असं देखील हुआंग गुओझी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : धक्कादायक! तब्बल 23 भक्त कोरोना पॉझिटिव्ह, अनेकजण क्वारंटाईनhttps://t.co/gOMqzovhkK#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 11, 2020
CoronaVirus News : डिस्चार्ज देताना रुग्णालयाने आकारलेलं बिल पाहून नातेवाईकांना बसला धक्काhttps://t.co/sVWC6b4dBD#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 10, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होणार?; IIT चा चिंता वाढवणारा रिसर्च
बापरे! पृथ्वीच्या दिशेने येतंय आणखी एक नवं संकट; नासानं दिला इशारा
CoronaVirus News : शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'हा' फॉर्म्युला लागू होणार?