भारतीय भूमीवर चीनचे काेणतेही गाव नाही; घुसखाेरीची माहिती खाेटी, किरेन रिजीजू यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 07:44 AM2021-11-12T07:44:27+5:302021-11-12T07:44:41+5:30

चीनने भारतीय हद्दीत घूसखाेरी करून गाव वसविल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये झळकल्या हाेत्या.

China has no village on Indian soil; Khaiti, Kiren Rijiju claims infiltration information | भारतीय भूमीवर चीनचे काेणतेही गाव नाही; घुसखाेरीची माहिती खाेटी, किरेन रिजीजू यांचा दावा

भारतीय भूमीवर चीनचे काेणतेही गाव नाही; घुसखाेरीची माहिती खाेटी, किरेन रिजीजू यांचा दावा

Next

नवी दिल्ली : चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखाेरी करून गाव वसविल्याची माहिती पूर्णपणे काेटी असल्याचा दावा केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजीजू यांनी केला आहे. अशा प्रकारची खाेटी माहिती पसरविणे गंभीर गुन्हा असल्याचेही ते म्हणाले. एका कार्यक्रमात ते बाेलत हाेते.

रिजीजू म्हणाले की, चीननेभारतीय हद्दीत घूसखाेरी करून गाव वसविल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये झळकल्या हाेत्या. हे चुकीचे असून दिशाभूल करणारे वृत्त दिल्याने लष्कराचे खच्चीकरण हाेते. रिजीजू यांनी यासंदर्भातील बातम्यांवर आक्षेप घेतला. ते म्हणाले, या परिसरातील वादग्रस्त भागात १९५९ नंतरच्या परिस्थितीत काेणताही बदल झालेला नाही. 

‘तो’ दावा केंद्राने फेटाळला

अमेरिकेच्या पेंटागाॅनने एका अहवालात चीनने वसविलेल्या गावाचा उल्लेख करण्यात आला हाेता. अरुणाचल प्रदेशमध्ये जवळपास १०० घरांचे गाव चीनने २०२०मध्ये वसविल्याचे पेंटागाॅनने म्हटले हाेते. मात्र, केंद्र सरकारने हा दावा फेटाळला आहे. संबंधित बांधकाम चीनच्या हद्दीत झाल्याचे सरकारने म्हटले हाेते.

Web Title: China has no village on Indian soil; Khaiti, Kiren Rijiju claims infiltration information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.