चिनी ड्रॅगन वठणीवर आला; संपूर्ण जम्मू-काश्मीर अन् अरुणाचल प्रदेश भारताच्या नकाशात दाखवला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 11:01 AM2019-04-26T11:01:51+5:302019-04-26T11:02:38+5:30

चीननं आता एका नकाशामध्ये पूर्ण जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हा भारताचाच अविभाज्य भाग असल्याचं दाखवलं आहे.

china map jammu kashmir arunachal pradesh part of india bri | चिनी ड्रॅगन वठणीवर आला; संपूर्ण जम्मू-काश्मीर अन् अरुणाचल प्रदेश भारताच्या नकाशात दाखवला!

चिनी ड्रॅगन वठणीवर आला; संपूर्ण जम्मू-काश्मीर अन् अरुणाचल प्रदेश भारताच्या नकाशात दाखवला!

Next

नवी दिल्लीः बऱ्याचदा अरुणाचल प्रदेशवर दावा करणाऱ्या चीननं आता एका नकाशामध्ये पूर्ण जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हा भारताचाच अविभाज्य भाग असल्याचं दाखवलं आहे. बीजिंगच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI)च्या दुसऱ्या समीटमध्ये चीननं हा नकाशा प्रदर्शित केला आहे. या नकाशामध्ये चीननं पूर्ण जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग दाखवला आहे. या नकाशामध्ये भारताला BRIचा एक भाग दाखवण्यात आले आहे.

भारतानं या समीटवर बहिष्कार घातला आहे. तत्पूर्वी 2017मध्येही भारत BRIच्या पहिल्या समीटमध्ये सहभागी झालेला नव्हता. या समीटमध्ये 37 देशांचा सहभाग आहे. BRI या प्रकल्पाचा उद्देश राज्यमार्ग, रेल्वे लाइन, बंदर आणि समुद्री मार्गाच्या माध्यमातून आशिया, आफ्रिका आणि युरोपला जोडण्याचा आहे. तीन दिवस चालणाऱ्या या समीटची सुरुवात गुरुवारी झाली आहे. हा नकाशा चीनच्या कॉमर्स मिनिस्ट्रीनं प्रदर्शित केला आहे. पूर्ण जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला भारताचा हिस्सा दाखवल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच चीननं अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग असलेले हजारो नकाशे नष्ट केले होते. चीननं उचललेल्या या पावलामुळे तज्ज्ञही बुचकळ्यात पडले आहेत.


पूर्ण जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला भारताचा हिस्सा दाखवून भारताला खूश करण्याची चीननं ही चाल तर नाही ना, असा प्रश्नही जाणकारांना सतावतो आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चीनचे सरकारी चॅनेल CGTNने पाकिस्तानच्या नकाशातून पाकव्याप्त काश्मीरही वेगळं दाखवलं होतं.

पाकव्याप्त काश्मीरला पाकिस्तानच्या नकाशातून बाहेर दाखवल्यानं त्याचा परिणाम चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरवरही होण्याची शक्यता आहे. भारतानं या प्रकल्पाला पाकव्याप्त काश्मीरमधून नेण्यास आधीच विरोध दर्शवला आहे. चीननं पाकव्याप्त काश्मीरमधल्या मूलभूत सुविधांवर मोठी गुंतवणूक केली आहे. परंतु भारतानं प्रोजेक्टवर नाराजी व्यक्त केली आहे. 

Web Title: china map jammu kashmir arunachal pradesh part of india bri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.