चीन, पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर तोंड देण्यास तयार -हवाईदल प्रमुख चौधरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 06:07 AM2021-10-06T06:07:38+5:302021-10-06T06:08:00+5:30

सीमेनजिक चीनने केलेल्या पायाभूत सुविधांचा भारताच्या युद्ध तयारीवर परिणाम होणार नाही.

China, Pakistan ready to face both fronts - Air Chief vivek ram Chaudhry | चीन, पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर तोंड देण्यास तयार -हवाईदल प्रमुख चौधरी 

चीन, पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर तोंड देण्यास तयार -हवाईदल प्रमुख चौधरी 

Next

नवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज असल्याचे हवाईदल प्रमुख विवेक राम चौधरी यांनी मंगळवारी स्पष्ट केले. ८ ऑक्टोबरच्या हवाई दल दिनाच्या पूर्वी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. 
चौधरी म्हणाले की, पूर्व लडाखमध्ये कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी हवाई दल तयार आहे. 

सीमेनजिक चीनने केलेल्या पायाभूत सुविधांचा भारताच्या युद्ध तयारीवर परिणाम होणार नाही. राफेल विमान आणि विविध शस्त्रास्त्रे ताफ्यात सहभागी झाल्याने भारतीय हवाई दलाची आक्रमक क्षमता अधिक शक्तिशाली झाली आहे. 

बलात्कार पीडितेची ‘टू फिंगर टेस्ट’ झाली नाही
भारतीय हवाई दलाच्या कोईमतूर येथील प्रशिक्षण संस्थेत बलात्कार झाल्याचा आरोप असलेल्या महिलेची (२८) टू फिंगर टेस्ट केली गेलेली नाही, असे भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी मंगळवारी येथे म्हटले. पत्रकार परिषदेत बोलताना चौधरी यांनी महिलेने टू फिंगर टेस्ट केली गेल्याचा दावा फेटाळला आणि जो कोणी या बलात्कार प्रकरणात दोषी आढळेल त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे सांगितले. 

 

Web Title: China, Pakistan ready to face both fronts - Air Chief vivek ram Chaudhry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.