भारताला सीमेवर घेरण्यासाठी चीनची नवी तयारी, LAC वर तयार करणार हायवे, डोकलाममध्ये वसवलं गाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 10:25 AM2022-07-21T10:25:45+5:302022-07-21T10:27:50+5:30

हाँगकाँगमधून प्रसिद्ध होणाऱ्या 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या वृत्तानुसार, तिबेटमधील ल्हुंज काउंटीपासून शिनजियांग प्रदेशातील काशगरमधील माझापर्यंत जाणारा हा महामार्ग नव्या राष्ट्रीय कार्यक्रमात प्रस्तावित करण्यात आलेल्या 345 कामांच्या योजनांपैकी एक आहे.

China plan to build new highway near the lac village built in Doklam | भारताला सीमेवर घेरण्यासाठी चीनची नवी तयारी, LAC वर तयार करणार हायवे, डोकलाममध्ये वसवलं गाव

भारताला सीमेवर घेरण्यासाठी चीनची नवी तयारी, LAC वर तयार करणार हायवे, डोकलाममध्ये वसवलं गाव

googlenewsNext

भारत-चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) ड्रॅगनच्या कुरापती सातत्याने वाढताना दिसत आहेत. चीन आपली सामरिक स्थिती अधिक बळकट करण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) एक नवा महामार्ग तयार करण्याची योजना आखत आहे, अशी माहती बुधवारी एका माध्यमाच्या वृत्तात देण्यात आली आहे.

हाँगकाँगमधून प्रसिद्ध होणाऱ्या 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या वृत्तानुसार, तिबेटमधील ल्हुंज काउंटीपासून शिनजियांग प्रदेशातील काशगरमधील माझापर्यंत जाणारा हा महामार्ग नव्या राष्ट्रीय कार्यक्रमात प्रस्तावित करण्यात आलेल्या 345 कामांच्या योजनांपैकी एक आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट 2035 पर्यंत एकूण 4,61,000 किमी लंबीचा हायवे आणि मोटरवे तयार करणे, असा आहे. खरे तर, आपल्या आर्थव्यवस्थेला चालणा देण्याच्या हेतूने चीन पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करत आहे.

तिबेट, नेपाळ आणि भारतातून जाणार महामार्ग - 
माध्यमातील वृत्तानुसार, ल्हुंज काउंटी हा अरूणाचल प्रदेशचा भाग आहे. चीन याला दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे म्हणतो. एवढेच नाही, तर गेल्या आठवड्यात जारी करण्यात आलेल्या  येजनेनुसार, जी-695 नावाने ओळखला जाणारा हा हायवे कोना काउंटीवरून जाण्याची शक्यता आहे. हे ठिकान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) बरोबर उत्तरेला आहे. काम्बा काउंटीची सीमा सिक्किमला लागून आहे. तसेच गयीरोंग काउंटीही नेपाळच्या सीमेजवळ आहे. हा प्रस्तावित हायवे तिबेट, नेपाळ आणि भारतातील बुरांग काउंटी आणि नगारी प्रांतातील जांदा काउंटीतूनही जाईल. तसेच, नगारी प्रांताच्या काही भागावर भारतचा कब्जा असल्याचेही या वृत्तात म्हणण्यात आले आहे.

अद्याप आधिकृत प्रतिक्रिया नाही - 
खरे तर हाँगकाँग माध्यमात प्रसिद्ध झालेल्या या वृत्तावर अद्याप कसल्याही प्रकराची आधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच, आपण आपल्या सीमारेषेवर लक्ष ठेवून आहोत, असे भारताने यापूर्वीच म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, भारत आणि चीन यांच्यात गेल्या दोन वर्षांपासूनही अधिक काळापासून लडाखचा प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा सुरू आहे. असे असतानाच एलएसीवरील या नव्या हायवे संदर्भातील वृत्त आले आहे.

डोकलाममध्ये PLA नं वसवलं गाव -  
चीनने भारतीय सीमेला गालून असलेल्या डोकलाम जवळ एक गाव वसवले आहे. नव्या सॅटेलाईट फोटोमध्ये साधारणपणे सर्वच घरांच्या बाहेर कार उभी असल्याचे दिसत आहे. 2017 मध्ये भारत आणि चीनचे सैनीक ज्या ठिकाणी समोरा समोर आले होते, त्या ठिकाणापासून हे गाव केवळ 9 किलोमिटर अंतरावर आहे. 

तत्पूर्वी, तिबेट रिजनमध्ये LAC जवळ चीन मोठ्या प्रमाणावर इंफ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट करत आहे. चीन सीमेलगत रस्ते, रेल्वे आणि एअर कनेक्टिव्हिटी वाढवत आहे. यामुळे पीएलएची क्षमता वाढेल. आपणही स्थितीचा सामना करण्यासाठी अपली क्षमता आणि यंत्रणा विकसित करत आहोत, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे.

Web Title: China plan to build new highway near the lac village built in Doklam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.