मालदीवमध्ये चीननं पाठवलं 'हेरगिरी करणारं जहाज; भारतानही श्रीलंका उतरवली शक्तिशाली पणबुडी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 11:57 AM2024-02-05T11:57:17+5:302024-02-05T11:57:50+5:30

"भारतीय नौदलाने आयएनएस करंज नावाची आपली पाणबुडी श्रीलंकेच्या एका मुख्य बंदरांत पाठवली आहे."

china sent Spy ship to Maldives; India also sends ins karanj submarine to sri lanka | मालदीवमध्ये चीननं पाठवलं 'हेरगिरी करणारं जहाज; भारतानही श्रीलंका उतरवली शक्तिशाली पणबुडी!

मालदीवमध्ये चीननं पाठवलं 'हेरगिरी करणारं जहाज; भारतानही श्रीलंका उतरवली शक्तिशाली पणबुडी!

भारत आणि चीन यांच्यातील तणाव कुणापासूनही लपलेला नाही. गेल्या काही वर्षांत चीननेभारताच्या शेजारील देशांमध्ये आपला प्रभाव निर्माण केला आहे. श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश यांसारख्या देशांमध्ये तो हळूहळू घुसखोरी करताना दिसत आहे. यामुळे भारताच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. याचा प्रत्यय त्याला श्रीलंकेत आला आहे. जेथे भारतीय नौदलाची पानबुडी पोहोचली आहे. 

डेक्कन हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय नौदलाने आयएनएस करंज नावाची आपली पाणबुडी श्रीलंकेच्या एका मुख्य बंदरांत पाठवली आहे. यामाध्यमाने चीनबरोबरच मालदीवलाही कडक संदेश देण्यात आला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या नेव्हीचे हेरगिरी करणारे जहाज 'जियांग यांग हाँग 3' मालदीवच्या दिशेने सरकत असतानाच आयएनएस करंज शनिवारी (3 फेब्रुवारी) श्रीलंकेत पोहोचले.

श्रीलंकन नौदलाला देण्यात आली माहिती -
भारतीय नौदलाची डिझेल-इलेक्ट्रिक पणबुडी आयएनएस करंज जेव्हा कोलंबो बंदरावर पोहोचली, तेव्हा श्रीलंकेच्या नौदलाने तिचे औपचारिक स्वागत केले. कोलंबोमध्ये नवी दिल्लीचे राजदूत संतोष झा यांनी पणबुडीचा दौरा केला आणि कमांडिंग ऑफिसर, कमांडर अरुणाभ आणि त्यांच्या क्रू मेंबर्ससह चर्चा केली. यावेळी श्रीलंकन नौदलाच्या जवळपास 100 नॉमिनेटेड कर्मचाऱ्यांना पाणबुडीसंदर्भात माहिती दिली. श्रीलंकेच्या राजधानीतील भारतीय उच्चायुक्तांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पाणबुडी सोमवारी कोलंबो बंदरातून रवाना होईल.

असा होता भारताचा उद्देश -
श्रीलंकेने रविवारी (४ फेब्रुवारी) आपला स्वातंत्र्यदिन साजरा केला. याच प्रसंगी नौदलाने आपली पाणबुडी श्रीलंकेत पाठवली. पाणबुडी पाठविण्या मागील भारताचा उद्देश हिंदी महासागरात सुरक्षा प्रदान करण्याप्रति आपली वचनबद्धता दर्शवने होता. यातून, ड्रॅगनने हिंदी महासागरात आपल्या कारवाया वाढवल्यास भारत प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. मालदीवची राजधानी माले येथे चिनी नौदलाचे 'हेरगिरी करणारे जहाज' जियांग यांग हाँग 3 दाखल होत असतानाच, भारतीय पाणबुडी श्रीलंकेत पोहोचली.
 

Web Title: china sent Spy ship to Maldives; India also sends ins karanj submarine to sri lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.