चीनने माझ्या भविष्याची चिंता करु नये - दलाई लामा

By admin | Published: April 8, 2017 06:36 PM2017-04-08T18:36:00+5:302017-04-08T18:42:38+5:30

तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांनी चीनला खडे बोल सुनावत आपल्या भविष्याचा निर्णय अनुयायी करतील चीन नाही असं स्पष्ट केलं आहे

China should not worry about my future - Dalai Lama | चीनने माझ्या भविष्याची चिंता करु नये - दलाई लामा

चीनने माझ्या भविष्याची चिंता करु नये - दलाई लामा

Next
>ऑनलाइन लोकमत
तवांग, दि. 8 - तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांनी चीनला खडे बोल सुनावत आपल्या भविष्याचा निर्णय अनुयायी करतील चीन नाही असं स्पष्ट केलं आहे. दलाई लामा यांनी चीनचं नाव न घेता आपल्यानंतर आपलं पद कायम राहणार की नाही हे माझे अनुयायी ठरवतील दुसरं कोणी नाही असं म्हटलं आहे. दलाई लामा यांनी चीनवर निशाणा साधला असून दलाई लामांच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. दलाई लामांनी चीनच्या दाव्याला फेटाळत खडे बोल सुनावले आहेत. 

(दलाई लामांना अरुणाचलमध्ये प्रवेश देणं भारताची मोठी चूक - चीन)
 
दलाई लामा यांनी शनिवारी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे अनुयायांना संबोधित केलं. तिबेटियन बौद्धांसाठी तवांग महत्वाची जागा मानली जाते. आपला उत्तराधिकारी कुठे जन्माला येईल याची माहिती आपल्याकडे असल्याच्या वृत्ताला त्यांनी फेटाळलं आहे. जेव्हा त्यांनी तुमचा उत्तराधिकारी एक महिला असू शकते का ? असं विचारलं असता हेदेखील शक्य आहे असं त्यांना सांगितलं आहे.
 
(दलाई लामांच्या भारत भेटीवर चीनची आगपाखड)
(दलाई लामा हे भ्रामक अभिनेते- चीन)
(भारताने दलाई लामांच्या दौ-याला परवानगी दिल्याने चीन चिडण्याची शक्यता)
 
तिबेटियन बौद्धांच्या परंपरेनुसार अध्यात्मिक गुरुच्या निधनानंतर वरिष्ठ भिक्षुक त्या तरुण मुलाची ओळख करुन देतात ज्याच्यामध्ये दिवंगत गुरुचा अवतार असल्याची लक्षणं दिसतात. चीनमध्ये नैसर्गिक आपत्ती आली असताना दलाई लामा मात्र अरुणाचल प्रदेशच्या दौ-यावर आहेत. अरुणाचल प्रदेश हा विवादास्पद भाग असून तो आपल्या अख्त्यारित येतो असा चीनचा पहिल्यापासून दावा आहे. 
 
तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांचा अरुणाचल प्रदेश प्रवेश रोखू न शकल्याने चिडलेल्या चीनने भारताला ही तुमची मोठी चूक असल्याचं सांगितलं आहे. सीमारेषेवरील राज्यात दलाई लामांना प्रवेश देण चूक असल्याचं सांगत चीन भारताविरोधातील आपला राग व्यक्त करत आहे. "दलाई लामांना अरुणाचल प्रदेशात प्रवेश दिल्याने द्विपक्षीय संबंधांवर याचा फरक पडेल", अशी धमकीचं चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी दिली होती. अरुणाचल प्रदेशात दलाई लामांनी कोणतीही हालचाल करणं चीनच्या पचनी पडत नसून त्यांनी वारंवार यासंबंधी भारताकडे आपला निषेध व्यक्त केला असल्याचंही ते बोलले आहेत.
 
गेल्यावर्षीच धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याला केंद्र सरकारने हिरवा झेंडा दाखवत परवनागी दिली होती. भारताने दलाई लामांच्या दौ-याला परवानगी दिल्याने चीन मात्र चिडण्याची शक्यता होती, त्याप्रमाणे चीनने आपला राग व्यक्त केला आहे. अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांच्याही अरुणाचल प्रदेश दौ-याला चीनने याअगोदर विरोध केला होता. मात्र परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या या आक्षेपाला फेटाळलं होता. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य घटक असल्याचं भारताने स्पष्ट सांगितलं होतं.
 
चीनने 2009 मध्येदेखील दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याला विरोध केला होता. चीन विरुद्धचा उठाव अयशस्वी झाल्यानंतर तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा याच दिवशी १७ मार्च १९५९ रोजी भारतात येण्यासाठी निघाले होते. हिमालयीन पर्वतरागांमधून १५ दिवस पायी प्रवास करुन चीनी सैनिकांना चुकवत दलाई लामा भारतात दाखल झाले होते.
 
अरुणाचल प्रदेश भारत आणि चीनमधील वादग्रस्त भाग असल्याने अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याचा आपण विरोध करतो असं चीनने म्हटलं होतं. तवांग फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी वर्मा यांनी हा दौरा केला होता. 
चीनने अगोदरपासून अरुणाचल प्रदेशावर दावा केला असून हा भारताचा भाग असल्याचं मानत नाही. राज्यातील 83,500 चौ.कि.मी परिसरावर चीनने दावा केलेला आहे.
 

Web Title: China should not worry about my future - Dalai Lama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.