गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 02:39 PM2020-06-17T14:39:37+5:302020-06-17T14:56:32+5:30
या व्हिडिओनंतर असे मानले जात आहे, की चीनने एक प्रकारे भारत आणि अमेरिकेला उघड-उघड धमकीच दिली आहे. सिप्रीच्या अहवालानुसार, भारताकडे 150 तर चीनकडे 320 आण्वस्त्र आहेत.
पेइचिंग :भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर, चीन पुरता बिथरला आहे. आता चीनने भारताला थेट हायड्रोजन बॉम्बची भीती दाखवायला सुरुवात केली आहे. जगात शांततेचे ढोंग करणाऱ्या चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने 1967मध्ये हायड्रोजन बॉम्बच्या परीक्षणाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. याच बरोबर, हा हायड्रोजन बॉम्ब स्वसंरक्षणासाठी असून आपला देश अण्वस्त्रांचा प्रथम वापर करणार नाही, या सिद्धांतावर कायम असल्याचे म्हटले आहे.
India China Dispute : गलवान खोऱ्यात चीननं पसरवलय जाळं; हळू-हळू अशी वाढवली ताकद
ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे, 'आजच्याच दिवशी 1967मध्ये चीनने आपल्या पहिल्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली होती. चीन निष्ठापूर्वक स्वसंरक्षणासाठी अण्वस्त्र धोरण राबवित आहे आणि अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या सिद्धांतावर कायम आहे. चीनच्या सरकारी वृत्तपत्राने हायड्रोजन बॉम्बच्या परीक्षणाचा हा व्हिडिओ, भारत आणि अमेरिकेसोबत त्याचा तणावर शिगेला पोहोचलेला असतानाच पोस्ट केला आहे.
#OnThisDay in 1967, China successfully detonated its first hydrogen bomb. China staunchly pursues a nuclear strategy of self-defense and is committed to the principle of non-first-use of #nuclear weapons. pic.twitter.com/jGiES6CxqT
— Global Times (@globaltimesnews) June 17, 2020
पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स', यांच्यामुळेच भारत-चीन आले 'आमने-सामने'
अण्वस्त्रांचे सार्वजनिक प्रदर्शन करतोय चीन -
या व्हिडिओनंतर असे मानले जात आहे, की चीनने एक प्रकारे भारत आणि अमेरिकेला उघड-उघड धमकीच दिली आहे. अण्वस्त्रांवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संस्था सिप्रीने नुकताच एक अहवाल जारी केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे, की चीन आपल्याकडील अण्वस्त्रांचे सार्वजनिकरित्या प्रदर्शन करत आहे. चीन आपल्याकडील अण्वस्त्रे अत्यंत वेगाने आधुनिक करण्याबरोबरच वाढवतही आहे.
चीनची भीती की चिथावणी? नेपाळ उचलतोय मोठं पाऊल; आता थेट अमेरिकेलाच देणार 'तगडा' झटका!
चीनकडे 320 अणू बॉम्ब
जागतीक महासत्ता बणण्याचे स्वप्न पाहत असलेला चीन आता झपाट्याने आण्विक क्षस्त्रांचा साठा वाढवू लागला आहे. चीनने आता पहिल्यांदाच जमीन, हवा आणि समुद्रातून मारा करता येतील, असे आण्वस्त्र तयार करायला सुरुवात केली आहे. आण्वस्त्रांवर नजर ठेवणारी आंतरराष्ट्रीय संस्था सिप्रीने म्हटले आहे, की भारत आणि चीन या दोघांनीही गेल्या वर्षी आपल्याकडील आण्वस्त्रांमध्ये वाढ केली आहे. मात्र, भारताकडील आण्वस्त्रे चीनच्या तुलनेत अर्ध्याहूनही कमी आहेत. सिप्रीच्या अहवालानुसार, भारताकडे 150 तर चीनकडे 320 आण्वस्त्र आहेत. गेल्या वर्षात चीनने 30 आण्वस्त्र तयार केली आहेत. तर भारताने 10 आण्वस्त्र तयार केली आहेत. तर पाकिस्तानकडे भारतापेक्षा अधिक आण्वस्त्र आहेत. त्यांच्याकडे एकूण 160 आण्वस्त्र आहेत.
CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कारण